Join us

हृतिक रोशनच्या १७ वर्षीय लेकाला पाहिलंत का? नेटकरी म्हणतात, 'नवा ग्रीक गॉड...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2025 17:57 IST

'ग्रीक गॉड' अशी ओळख असलेला हँडसम हंक हृतिक रोशनची दोन्ही मुलंही आता लक्ष वेधून घेत आहेत.

'ग्रीक गॉड' अशी ओळख असलेला हँडसम हंक हृतिक रोशनची (Hrithik Roshan) दोन्ही मुलंही आता लक्ष वेधून घेत आहेत. नुकतंच रोशन कुटुंबाची 'द रोशन्स' ही डॉक्युमेंटरी नेटफ्लिक्सवर रिलीज झाली. याच्याच सक्सेस पार्टीचं काल आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी हृतिक आणि सुजैनच्या १७ वर्षीय मुलाने लक्ष वेधून घेतलं. वडिलांसारखाच चार्म त्याच्यातही दिसून आला. भविष्यातला नॅशनल क्रश अशा प्रतिक्रिया चाहते देत आहेत.

'द रोशन्स' च्या सक्सेस पार्टीला अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती. हृतिक त्याचे वडील राकेश रोशन यांच्यासोबत आलाच होता. त्यांचं संपूर्ण कुटुंब उपस्थित होतं. यावेळी ज्युनिअर रोशनवर सर्वांच्याच नजरा खिळल्या. हृतिकचा मुलगा रिदान (Hridaan) १७ वर्षांचा आहे. व्हाईट टीशर्ट, त्यावर चेक्स शर्ट, पँट अशा लूकमध्ये तो दिसला. तशीच उंची, गोरा पान, भोळा चेहरा अगदी हृतिकचीच झलक त्याच्यात दिसते. फक्त त्याचे डोळे हृतिकसारखे नसून आईवर गेले आहेत. पापाराझींसमोर क्युट स्माईल देत तो उभा होता. यावेळी त्याच्यासोबत हृतिक, राकेश रोशन बाजूलाच उभे होते. हतिकसारखाच तो उंचही दिसत होता. त्याला पाहून कोणाचीच नजर त्याच्यावरुन हटत नव्हती.

'आर्यन आणि इब्राहिमला भविष्यात चांगलाच स्पर्धक मिळाला आहे', 'हा तर मोठा होऊन हृतिकपेक्षाही जास्त हँडसम दिसेल', 'वडील आणि आजोबांप्रमाणेच किती हँडसम दिसतोय', 'मुलींचा नवा क्रश', 'नवीन ग्रीक गॉड' अशा एकापेक्षा एक कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत. 

हृतिक आणि सुजैनला रेहान हा आणखी एक मुलगा आहे. तो १५ वर्षांचा आहे. दोघंही वडिलांसारखेच हँडसम आहेत. रिदानला पाहून तर तो सर्व स्टारकीड्सला मागे टाकेल असा त्याचा लूक आहे. भविष्यातला नॅशनल क्रश' म्हणत त्याची सगळीकडे स्तुती होत आहे.

टॅग्स :हृतिक रोशनबॉलिवूडपरिवारसोशल मीडिया