Join us

 हृतिक-सुजैननं केली ‘एक्स’ आणि ‘नेक्स्ट’सोबत पार्टी; ट्रोलर्स म्हणाले, मिक्स्ड बिर्यानी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2022 17:28 IST

Hrithik Roshan , Sussanne Khan : सध्या हृतिक व सबा आझाद (Saba Azad) एकमेकांसोबत खुल्लमखुल्ला हातात हात घालून फिरताना दिसत आहेत. दुसरीकडे हृतिकची ‘एक्स’ सुजैन खान ही सुद्धा प्रेमात आहे.

बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन (Hrithik Roshan)आणि सुजैन खान  (Sussanne Khan ) यांच्या घटस्फोटाला आता बरीच वर्ष झालीत. सुजैन आयुष्यातून गेल्यानंतर हृतिक आत्ताआत्तापर्यंत सिंगल होता. पण अलीकडे त्याच्या आयुष्यात लेडी लव्हची एन्ट्री झाली. ती कोण तर सबा आझाद. सध्या हृतिक व सबा आझाद (Saba Azad) एकमेकांसोबत खुल्लमखुल्ला हातात हात घालून फिरताना दिसत आहेत. दुसरीकडे हृतिकची ‘एक्स’ सुजैन खान ही सुद्धा प्रेमात आहे. होय, सध्या ती अर्सलान गोनीला  (Arslan Goni) डेट करतेय. अलीकडे हे चौघंही एकत्र आलेत. होय, चौघांनीही गोव्यात पार्टी केली. या पार्टीत हृतिक सबासोबत दिसला तर सुझैन अर्सलानसोबत.

गोव्यातील पार्टीचं निमित्त काय होतं तर, सुजैनचे नवे बार-किचन. होय, सुजैनने गोव्यात स्वत:चं बार किचन सुरू केलं आहे. याचीच पार्टी झाली. या पार्टीत हृतिक त्याची कथित गर्लफ्रेन्ड सबासोबत आला. तर सुजैन अर्सलानसोबत आली.सुजैनने स्वत: पार्टीचे अनेक फोटो व्हिडीओ कोलाजच्या रूपात तिच्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. यात तिने हृतिक आणि सबासोबत पोजही दिल्या आहेत.  

ट्रोलर्स म्हणाले...हृतिकला त्याची एक्स आणि नेक्स्टसोबत पाहून ट्रोलर्सनी ट्रोल केलं नसेल तर नवल. हे चौघं असे एका फ्रेममध्ये पाहणं अनेकांना रूचलं नाही. अनेकांनी यावर कमेंट्स केल्यात. याला म्हणतात मिक्स्ड बिर्यानी, अशी कमेंट एका युजरने केली. ‘काय जमाना आला, नवरा गर्लफ्रेन्डसोबत, बायको बॉयफ्रेन्ड सोबत... देवा, वाचव रे,’ अशी कमेंट अन्य एकाने केली. अनेकांनी मात्र सुजैन व हृतिकचा बचाव केला. ‘वाईट गोष्टी घडतात आणि तुम्ही पुढे जा....,’अशा आशयाच्या कमेंट्स अनेकांनी केल्या. एका युजरने मात्र वेगळीच इच्छा व्यक्त केली. ‘अभिनंदन, पण तू (सुजैन) आणि हृतिक दोघांनी पुन्हा एकत्र यावं अशी माझी इच्छा असल्याचं हा युजर म्हणाला

टॅग्स :हृतिक रोशनसुजैन खान