Join us

Hrithik Roshan Saba Azad: हृतिक अन् सबाचा लिपलॉक Video व्हायरल; फॅन्स म्हणाले...अरे भाई रुको सब्र करो...!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2023 3:06 PM

Hrithik Roshan Saba Azad: हृतिक रोशनच्या लव्ह लाईफची चर्चा सध्या जोरात आहे. गेला काही महिन्यांपासून हृतिक सबाला डेट करतोय...

Hrithik Roshan Saba Azad: हृतिक रोशनच्या लव्ह लाईफची चर्चा सध्या जोरात आहे. हृतिक सध्या सबा आझादसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. गेला काही महिन्यांपासून हृतिक सबाला डेट करतोय. अद्याप दोघांनीही आपल्या नात्याची अधिकृत कबुली दिलेली नाही. पण म्हणून हे नातं कुणापासून लपून राहिलेलं नाही. दोघंही अनेकदा हातात हात घालून एकत्र फिरताना दिसतात. तूर्तास दोघांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओत दोघं एकमेकांना किस करताना दिसत आहेत.हृतिक व सबा आज २७ फेब्रुवारीला मुंबई एअरपोर्टवर दिसले. हृतिकला सोडण्यासाठी सबा एअरपोर्टवर आली होती. कारमधून उतरण्याआधी हृतिकने सबाला किस केलं. यानंतर तो कारमधून उतरून एअरपोर्टच्या आत गेला.  

 गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये हृतिक व सबा दोघं पहिल्यांदा एकत्र दिसले होते. सबा आझाद एक बॉलिवूड अभिनेत्री आहे. 1 नोव्हेंबर 1990 रोजी जन्मलेली आणि दिल्लीत लहानाची मोठी झालेल्या सबाने थिएटर आर्टिस्ट म्हणून अ‍ॅक्टिंग करिअरला सुरूवात केली. यानंतर ती चित्रपटांकडे वळली. 2008 साली ‘दिल कबड्डी’ या सिनेमातून तिचा डेब्यू झाला. यात ती राहुल बोससोबत स्क्रिन शेअर करताना दिसली होती. पण तिला ओळख दिली ती 2011 साली रिलीज ‘मुझसे फ्रेन्डशिप करोगे’ या सिनेमाने. यात तिच्या अपोझिट साकिब सलीम दिसला होता. त्याआधी सबाने अनेक शॉर्ट फिल्म्समध्ये काम केलं आहे. 2021 साली म्हणजे गतवर्षी ती ‘फील्स लाइक इश्क’ या सिनेमात दिसली होती. 

हृतिकच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर, तो सध्या फायटर या सिनेमात बिझी आहे. या चित्रपटात तो दीपिका पादुकोणसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. हा बिग बजेट सिनेमा २५ जानेवारी २०२४ रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.

टॅग्स :हृतिक रोशनबॉलिवूड