Join us

हृतिक रोशनने शेअर केला वर्कआउट व्हिडीओ, तर EX वाइफ सुजैन खान दिली अशी कमेंट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2019 6:00 AM

हृतिक फिटनेसचा इंटरनॅशनल ट्रेंड आणि वर्कआउट रुटीन फॉलो करतो. यामध्ये तो कार्डियो, स्ट्रेचिंग, पावर वर्कआउट करतो.

हृतिक सध्या आनंद कुमारवर तयार होत असलेल्या 'सुपर 30' बायोपिकमध्ये व्यस्त आहे.‘सुपर 30' ऋतिक रोशन एका शिक्षकाची भूमिका साकारत आहे.  हृतिकचा एक फोटो समोर आला आहे. या सिनेमातल्या भूमिकेसाठी वजन कमी करण्यासाठी हृतिक प्रचंड मेहनत घेत आहे. त्याची  पिळदार बॉडी कुणालाही घायाळ करेल अशीच आहे. आपल्या फिटनेसच्या दिनचर्येकडे बिल्कुल दुर्लक्ष होऊ देत नाही. रोज 20-30 मिनिटांची कार्डियो एक्सरसाइज करतो. तो आठवड्यातून 4 दिवस एक्सरसाइज करतो आणि तीन दिवस  आराम करतो.

हृतिक फिटनेसचा इंटरनॅशनल ट्रेंड आणि वर्कआउट रुटीन फॉलो करतो. यामध्ये तो कार्डियो, स्ट्रेचिंग, पावर वर्कआउट करतो. सध्या हृतिक रोशन चाहत्यांप्रमाणे एक्स-वाईफ सुजैन खानचाही प्रेरणास्थान बनलाय. 'हृतिकचा वर्कआऊट व्हिडीओ पाहून सुजैनही त्याचे तोंडभरून कौतुक करताना पाहायला मिळत आहे. ''20 वर्षापूर्वीच्या तुलनेत आता तु अधिक हॉट'' दिसत असल्याचे सुजैनने म्हटले आहे. 

हृतिक आणि सुजैन यांचा घटस्फोट झाला असूनही वेळोवेळी हे दोघे एकत्र पहायला मिळतात. एकेकाळी बॉलिवूडच्या बेस्ट कपलपैकी हे एक कपल होते. पण अचानक या दोघांनी एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आणि २०१४ मध्ये कायदेशीर घटस्फोट घेत हा निर्णय अमलातही आणला.हृतिक-सुजैन चार वर्षांपूर्वी कायदेशीर घटस्फोट घेऊन एकमेकांपासून वेगळे झालेत. पण त्यांची मैत्री आजही कायम आहे. 

टॅग्स :हृतिक रोशन