हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि त्याची Ex पत्नी सुझैन खान (Sussanne Khan) दोघांचाही घटस्फोट झाल्यानंतर सगळ्या भूतकाळातल्या घडलेल्या गोष्टी विसरत आपापल्या आयुष्यात खूप पुढे निघून गेले आहेत. सुझैन अलीकडेच गोव्यात व्हॅकेशनसाठी गेली होती. निवांत वेळ एन्जॉय केल्यानंतर सुझैन आता मुंबईत परतली आहे. घटस्फोट झाल्यापासून सुझैन पती हृतिक रोशनपासून एका वेगळ्या फ्लॅटमध्ये राहत होती, आता सुझैनने स्वतःचे स्वप्नवत आलिशान फ्लॅट खरेदी केला आहे. सुझैन आता तिच्या दोन्ही मुलांसोबत नवीन फ्लॅटमध्ये शिफ्ट झाली आहे.
सुझैन खानचे हे घर सी-फेसिंग आहे, हृतिक रोशनच्या घरापासून तिचे नवीन घर खूप जवळ आहे. सुझैनचा भलेही हृतिक रोशनपासून घटस्फोट झाला असेल, पण तरीही दोघांमध्ये मैत्रीचे नाते आजही कायम आहे. हृतिकही आपल्या मुलांना भेटण्यासाठी सुझैननच्या या नवीन घरी अधून- मधून जात असतो.इतकंच काय तर मुलांसोबत सुझैनसोबत हृतिकसुद्धा अनेकदा क्लॉलिटी टाईम एन्जॉय करताना दिसतो.
हृतिक रोशन आणि सुझैन खान यांच्या सुरु असलेला सुखी संसारात नेमके कोणत्या कारणामुळे दुरावा आला हे आजपर्यंत कोणालाच कळाले नाही. घटस्फोट झाल्यानंतर खुद्द हृतिक रोशननेच याविषयी माहिती दिली होती. तसेच विवाह संस्थेवर विश्वास असल्याचेही हृतिकने म्हटले होते.हृतिक रोशनने 2000 मध्ये त्याची गर्लफ्रेंड सुजैन खानसोबत लग्न केले होते. लग्नानंतर सुझैनने दोन मुलांना जन्म दिला. रिदान आणि रेहान अशा दोन्ही मुलांची नावं आहेत. पण लग्नाच्या 14 वर्षानंतर दोघांनी घटस्फोटाचा निर्णय घेत चाहत्यांना मोठा धक्काच दिला होता.
दोघांनी एकमेकांच्या संमतीने घटस्फोट घेतला आणि वेगळे झाले. त्यांच्या घटस्फोटामागे हृतिक रोशनची कंगना राणौत (Kangana Ranaut) सह वाढणारी जवळीक हे कारण असल्याचं म्हटलं जात होतं. हृतिक आणि सुझानचा घटस्फोट हा बॉलीवूडमधला सर्वात महागडा घटस्फोट ठरला होता.सुझानने हृतिककडून ४०० कोटी रुपये पोटगी म्हणून मागितल्याच्याही चर्चा झाल्या होत्या.पण हृतिकने ३८० कोटी रुपये पोटगीच्या रुपात सुझैनला दिल्याचे बोलले जाते.बॉलिवूडमध्ये आजपर्यंत सर्वाधिक पोटगी देण्याचा रेकॉर्ड या कपलच्या नावावरच आहे.