हृतिक रोशन (Hritik Roshan), दीपिका पादुकोण (Deepika Padukone) आणि अनिल कपूर (Anil Kapoor) स्टारर भारतातील सर्वात मोठा एरियल अॅक्शन चित्रपट 'फाइटर' (Fighter Movie) बद्दल खूप उत्सुकता आहे. आता 'फाइटर' चित्रपटातील हृतिक रोशनचा बहुप्रतिक्षित लूक समोर आला आहे, ज्यामुळे चाहते खूपच प्रभावित झाले आहेत. यात हृतिक रोशन स्क्वॉड्रन लीडर शमशेर पठानियाची भूमिका साकारत आहे., ज्याला त्याच्या कॉल साइन 'पॅटी' या नावाने ओळखले जाते. नुकतेच हृतिक रोशनने सोशल मीडियावर फाइटरचा फर्स्ट लूक शेअर केला आहे. त्याच्या या लूकला चाहत्यांची पसंती मिळते आहे.
अलीकडेच हृतिक रोशनने त्याचा फर्स्ट लूक सोशल मीडियावर शेअर केला आहे. यासोबतच पॅटी उर्फ स्क्वाड्रन लीडर शमशेर पठानिया या त्याच्या व्यक्तिरेखेचे वर्णन करताना त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, स्क्वाड्रन लीडर समशेर पठानिया. कॉल साइन: पॅटी, पदनाम: स्क्वाड्रन पायलट, युनिट: एअर ड्रॅगन.
फाइटरमध्ये हृतिक रोशनच्या पॅटीचा भारताचा सर्वोत्कृष्ट फाइटर पायलट होण्याचा प्रवास दाखवण्यात आला आहे. या चित्रपटात पहिल्यांदाच हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण यांची ऑन-स्क्रीन जोडी पाहायला मिळणार आहे. त्यामुळे त्यांचे चाहते या चित्रपटाची उत्सुकतेने वाट पाहत आहेत. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित, आणि व्हायकॉम18 स्टुडिओ आणि मार्फलिक्स पिक्चर्सच्या सहकार्याने बनलेला, हा चित्रपट २५ जानेवारी, २०२४ रोजी भेटीला येणार आहे.