लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा असतो. आकर्षक अशी साडी, डोक्यावर भली मोठी बिंदी, कपाळावर सिंदूर आणि गळ्यात दागदागिने अशा अंदाजात हृतिक रोशनची आई पिंकी रोशन नटल्या होत्या. पुन्हा एकदा नववधू प्रमाणे नटल्याचा आनंद पिंकी रोशन यांच्या चेह-यावर पाहायला मिळत आहे. हेच फोटो त्यांच्या आनंदाला पारावर उरला नसल्याची ग्वाही देत असल्याचे दिसतंय. मात्र हे फोटो पाहून पाहून सारेच संभ्रमात पडल्याचे पाहायला मिळत आहे.
राकेश रोशन आणि पिंकी रोशन यांच्या लग्नाला ५० वर्ष पूर्ण झाली आहेत.लग्नाची ५० वर्षाचे अनोखे सेलिब्रेशन म्हणून अॅनिव्हर्सरीच्या दिवशी पिंकी यांनी पुन्हा एकदा नववधू प्रमाणे नटत आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. सोशल मीडियावर अनोखे सेलिब्रेशनचे फोटो प्रचंड व्हायरल झाले आहेत. हातावर मेहंदी, आकर्षक साडीमध्ये नवराई पिंकी रोशन यांचे सौंदर्य आणखी खुलून गेले होते.
नवरी इतकी नटून थटून तयार असताना नवरदेव राकेश रोशन तरी केस मागे राहणार त्यांनीही खास स्टाईलमध्ये कपडे परिधान केले होते. लॉकडाऊनध्येही त्यांनी त्यांच्या या खास दिवस अनोख्या ढंगात एन्जॉय केला .त्यामुळे ख-या अर्थाने या मेड फॉर इच अदर कपलची वेडींग अॅनिव्हर्सरी स्पेशल ठरली होती. चित्रपटसृष्टीतील अनेक सेलिब्रेटींनी त्यांच्या या फोटोंवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
गेल्यावर्षी देखील राकेश रोशन यांनी अशाच प्रकारे लग्नाचा वाढदिवस सेलिब्रेट केला होता. लॉकडाऊनमुळे वेगवेगळे राहत असलेल्या रोशन कुटुंबीयांनी व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून एकत्र येऊन हे सेलिब्रेशन केले होते. व्हिडिओमध्ये हृतिक, सुझान आणि त्यांची मुले हॅपी अॅनिव्हर्सरी गाणे गाताना दिसले होते. लग्नाच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ हृतिकने शेअर केला होता. राकेश रोशन आणि पिंकी यांचे लग्न 1970 मध्ये झाले होते. पिंकी या राकेशच्या बालपणीच्या मैत्रीण आहेत.