Join us

ऋतिक रोशनचा 'सुपर 30'मध्ये मेकर्संनी केला 'हा' मोठा बदल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2018 2:50 PM

ऋतिक रोशनचा सुपर 30 हा आनंद कुमार यांचा बायोपिक म्हणून तयार करण्यात येणार होता.  मात्र आता तो बायोपिक म्हणून नाही तर एक प्रेरणादायी कथेच्या स्वरुपात तयार करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देआता मेकर्स हा सिनेमा एका काल्पनिक गोष्टीवर आधारित म्हणून तयार होणार आनंद कुमार यांच्याशी संबंधीत सर्व संदर्भ काढून टाकण्याचा विचार करतायेत. 

ऋतिक रोशनचा सुपर 30 हा आनंद कुमार यांचा बायोपिक म्हणून तयार करण्यात येणार होता.  मात्र आता तो बायोपिक म्हणून नाही तर एक प्रेरणादायी कथेच्या स्वरुपात तयार करण्यात येणार आहे. होय, तुम्ही बरोबर वाचलात गणितज्ञ आनंद कुमार यांच्या आयुष्यावर आधारित तयार होणाऱ्या या सिनेमात बदल करण्यात आले आहेत. 

काही दिवसांपूर्वी आनंद कुमार यांच्या सुपर 30 संस्थेच्या विरोधात काही रिपोर्टससमोर आले होते. त्यामुळे निर्माता आणि दिग्दर्शक या सिनेमाला बायोपिक म्हणण्याचे टाळताना दिसतायेत. आता मेकर्स हा सिनेमा एका काल्पनिक गोष्टीवर आधारित आहे अशा पद्धतीने सादर करणार आहेत.  एका पोर्टलच्या रिपोर्टनुसार, सिनेमा पोस्ट प्रोडक्शनच्या फेजमध्ये आहे त्यामुळे आनंद कुमार यांच्याशी संबंधीत सर्व संदर्भ काढून टाकण्याचा विचार करतायेत. 

 आनंद कुमार बिहारात ‘सुपर30’ नावाचा एक प्रोग्राम चालवतात. या प्रोग्रामअंतर्गत आनंद कुमार यांनी आत्तापर्यंत अनेक गरिब व होतकरू मुलांना नि:शुल्क शिकवून त्यांना आयआयटीमध्ये प्रवेश मिळवून दिला आहे. जे विद्यार्थी अतिशय हुशार आहेत परंतु आर्थिक अडचणींमुळे आयआयटीच्या परीक्षा देऊ शकत नाहीत, अशा विद्यार्थ्यांना आनंद कुमार संधी देतात. दरवर्षी भारतभर फिरून  निवडक ३० विद्यार्थी निवडून हे आनंद कुमार पाटण्याला त्यांच्या घरी आणतात. त्यांचा राहण्या खाण्यापासून ते कोचिंग आणि नंतर प्रवेश परीक्षा असा सर्व खर्च आनंद स्वत: करतात. या कामात त्यांना त्यांची पत्नी भाऊ आणि आई मदत करतात.  

टॅग्स :हृतिक रोशन