Join us

अखेर या दिवशी प्रदर्शित होणार हृतिक रोशनचा ‘सुपर 30’!!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2019 11:58 AM

हृतिक रोशनच्या ‘सुपर 30’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारिख अधिकृतपणे घोषीत करण्यात आली. आता हा चित्रपट ‘या’ तारखेला रिलीज होईल.

ठळक मुद्दे‘सुपर 30’ हा आयआयटी कोचिंग संस्थेचे संस्थापक आनंद कुमार यांच्या जीवनावर आधारित चित्रपट आहे.  

अखेर हृतिक रोशनच्या ‘सुपर 30’ या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर झालीच. हृतिकचा हा सिनेमा येत्या 26 जुलैला प्रदर्शित होणार होता. पण असे झाले असते तर एकता कपूर निर्मित आणि कंगना राणौत स्टारर ‘मेंटल है क्या’ या चित्रपटासोबत हृतिकच्या या सिनेमाचा संघर्ष अटळ होता. म्हणजे,  हृतिक आणि कंगनाचा चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित झाला असता. हृतिकला हे नको होते. त्यामुळे त्यानेच नमते घेतले आणि ‘सुपर 30’ची रिलीज डेट बदलण्यास सांगितले.  त्यासाठी हृतिकने ट्विटरवर एक पोस्ट लिहीली होती. ‘मला माझ्या चित्रपटावर कोणत्याही माध्यमांच्या चर्चांचा प्रभाव पडू द्यायचा नाही. मी स्वत:ला मानसिक त्रास आणि छळापासून दूर ठेवण्यासाठी माझ्या सुपर ३० चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलण्याचा विचार केला आहे. चित्रपट प्रदर्शनाच सज्ज झाला असला तरी मी चित्रपट निर्मात्यांना प्रदर्शनाची तारीख बदलून नवी तारीख घोषीत करण्याची विनंती करतो’ असे हृतिकने पोस्टमध्ये लिहिले होते.त्यानुसार,  चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारिख अधिकृतपणे घोषीत करण्यात आली. आता हा चित्रपट १२ जुलैला रिलीज होईल.

ट्रेड अ‍ॅनालिस्ट तरण आदर्श यांनी ट्विटरद्वारे ‘सुपर 30’ च्या प्रदर्शनाची तारिख जाहीर केली.  ‘सुपर 30’ च्या प्रदर्शनाची तारिख ठरली. १२ जुलै २०१९, असे त्यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे. अर्थात १२ जुलै या नव्या तारखेलाही एकता कपूरचा आणखी एक सिनेमा रिलीज होतोय. सिद्धार्थ मल्होत्रा आणि परिणीती चोप्रा स्टारर ‘जबरिया जोडी’हा सिनेमाही १२ जुलैला रिलीज होतोय. पण यावेळी एकता कपूर एक पाऊल मागे घेत, ‘जबरिया जोडी’ची रिलीज डेट बदलवू शकते. शेवटी एकता हृतिकची चांगली मैत्रिण आहे. अशात दुसºयांदा हृतिकला दुखावणे कदाचित तिला शक्य होणार नाही.

‘सुपर 30’ हा चित्रपट दीर्घकाळापासून रखडला आहे. आधी हा चित्रपट नोव्हेंबर 2018 मध्येच प्रदर्शित होणार होता. पण या चित्रपटाचा दिग्दर्शक विकास बहलचे नाव मीटू मोहिमेत आले. त्यामुळे त्याला या चित्रपटातून हटवण्यात आले. साहजिकच ‘सुपर 30’ लांबला. पुढे या चित्रपटासाठी 26 जानेवारी 2019 चा मुहूर्त ठरला. पण यावेळी कंगनाचा ‘मणिकर्णिका’ आडवा आला. त्याहीवेळी हृतिकने ‘सुपर 30’ची रिलीज डेट पुढे ढकलली होती. ‘सुपर 30’ हा आयआयटी कोचिंग संस्थेचे संस्थापक आनंद कुमार यांच्या जीवनावर आधारित चित्रपट आहे.  

 

टॅग्स :हृतिक रोशन