ऋतिक रोशनचा सिनेमा 'सुपर30' रिलीजच्या आधीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहे. सुपर 30 ला रिलीज डेट मिळत नसल्याची चर्चा होती. सुपर 30 च्या आसपास रिलीज होणारे 'मणिकर्णिका' आणि 'चीट इंडिया'चा ट्रेलर रिलीज झाले आहे. मात्र अद्याप सुपर 30 चा टीजरदेखील आऊट झाला नाही.
'ठाकरे' सिनेमा 25 तारखेला रिलीज होणार आहे. गत बुधवारी सिनेमाचा ट्रेलर लाँचदेखील झाला आहे. 'सुपर30' 25 जानेवारीला रिलीज होणार होता मात्र आता असे अंदाज आहे सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात येईल. त्यामुळे या सगळ्याचा सरळ फायदा कंगना राणौतच्या 'मणिकर्णिका' इम्रान हाश्मीच्या चीट इंडिला होणार.
ऋतिक रोशनचा ‘सुपर 30’बाबत बोलायचे झाले तर हा सिनेमा आनंद कुमार यांचा बायोपिक म्हणून तयार करण्यात येणार होता. मात्र आता तो बायोपिक म्हणून नाही तर एक प्रेरणादायी कथेच्या स्वरुपात तयार करण्यात येणार आहे. आनंद कुमार बिहारात ‘सुपर30’ नावाचा एक प्रोग्राम चालवतात. या प्रोग्रामअंतर्गत आनंद कुमार यांनी आत्तापर्यंत अनेक गरिब व होतकरू मुलांना नि:शुल्क शिकवून त्यांना आयआयटीमध्ये प्रवेश मिळवून दिला आहे. जे विद्यार्थी अतिशय हुशार आहेत परंतु आर्थिक अडचणींमुळे आयआयटीच्या परीक्षा देऊ शकत नाहीत, अशा विद्यार्थ्यांना आनंद कुमार संधी देतात. दरवर्षी भारतभर फिरून निवडक ३० विद्यार्थी निवडून हे आनंद कुमार पाटण्याला त्यांच्या घरी आणतात. त्यांचा राहण्या खाण्यापासून ते कोचिंग आणि नंतर प्रवेश परीक्षा असा सर्व खर्च आनंद स्वत: करतात. या कामात त्यांना त्यांची पत्नी भाऊ आणि आई मदत करतात.