गेल्या काही दिवसांपासून हृतिक रोशन (Hrithik Roshan) आणि त्याच्या अर्ध्या वयाची असलेली सबा आजाद (Saba Azad) यांच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या आहेत. सबा आजाद तिच्या कामामुळे कमी आणि हृतिकसोबतच्या नात्यामुळेच जास्त चर्चेत असते. सध्या तिची 'हू इज युअर गायनॅक' ही सीरीज आली आहे ज्यात ती डॉ विदुषीच्या भूमिकेत आहे. सिरीजच्या प्रमोशनवेळी तिने माध्यमांशी संवाद साधला.
सबा म्हणाली,'मी चार वर्षांची असल्यापासून स्टेजवर परफॉर्म करत आहे. मात्र आजपर्यंत मी लक्षात राहण्यासारखं काम केलेलं नाही. माझं वैयक्तिक आयुष्यामुळे लोक माझ्या कामाकडे दुर्लक्ष करत आहेत असं वाटतंय. मी अनेकांसमोर एक्सपोज झाली आहे. ते मला पर्सनल कारणांमुळे जज करत आहेत. पण मी जर हाच विचार करत बसले तर मी काम कसं करणार. जे आज बोलत आहेत ते उद्याही बोलतच राहणार आहेत.'
हृतिक आणि सबाच्या रिलेशनशिपच्या चर्चा गेल्या वर्षी सुरु झाल्या. तेव्हापासून सबा आजाद प्रकाशझोतात आली. दोघंही अर्जेंटिना येथे सुट्टी एन्जॉय करुन आले. त्यांचे रोमँटिक फोटो समोर आले. ते रिलेशनशिप कधीच लपवताना दिसले नाहीत तर खुल्लमखुल्ला मान्य करत आहेत. त्यांना अनेकदा डेटवर, फॅमिली फंक्शनमध्ये सोबत पाहिलं गेलं आहे. दोघंही लग्न करणार असल्याच्याही चर्चा आहेत.
हृतिकच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं तर त्याचा 'फायटर' हा सिनेमा रिलीज होतोय. यामध्ये अनिल कपूर आणि दीपिका पदुकोणही दिसणार आहेत.