Join us

सुशांत साराबाबत जे घडले तेच हृतिक आणि माझ्याबाबतीतही, दोघांनाही दूर करणे हा बॉलिवूड माफियांनी रचलेला कट- कंगणा राणौत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2020 14:56 IST

'केदारनाथ सिनेमातून' हिंदी चित्रपटसृष्टीत  पदार्पण केलेल्या सारा अली खानची सुशांतसह ऑनस्क्रीन केमिस्ट्री  पाहायला मिळाली. पदार्पणाच्या सिनेमापासून या ना त्या कारणामुळे सारा आणि सुशांतची जोडी चर्चेत राहिली.

बेधडक आणि बिनधास्त अंदाजामुळे कंगणाच्या सिनेमापेक्षा तिच्या खासगी आयुष्यातील घडामोडींचीच चर्चा सर्वाधिक चर्चा रंगते. बॉलिवूडमध्ये वादग्रस्त राहिलेल्या अफेअरमध्ये हृतिक रोशन आणि कंगणा राणौत यांचाही वारंवार उल्लेख केला जातो. नुकतेच सुशांतच्या मित्रांने सुशांतचे सारा अली खान मध्ये मैत्रीपलिकडे घट्ट नाते फुलु लागले होते. या दोघांचे एकमेकांवर प्रेम असल्याचे सांगितले आहे. अचानक दोघांमध्ये असे काही घडले की,एकमेकांपासून दूर गेले. याच गोष्टीच आश्चर्य वाटत असल्याचे त्याने म्हटले आहे. यावर कंगणानेही आपले मत मांडले आहे. 

 

 

सुशांतसह साराची वाढलेली जवळीकही खटकली असणार आणि म्हणून तिला सुशांतपासून दूर राहण्याचे सांगितले गेले असणार. सुशांतवर साराचेही प्रेम असणारच मात्र तिच्यावर आलेल्या दबाबामुळेच ती लांब गेली असावी असे तिने सांगितले आहे. माझ्याही बाबतीत असेच काहीसे घडले होते. माझे हृतिकवर प्रचंड प्रेम होते. मात्र या गोष्टी अशा काही बदलल्या गेल्या की मलाही कळले नाही.  हृतिकचे अशा प्रकारे अचानक बदलणे, माझ्यापासून अचानक दूर जाणे अशी अनेक प्रश्न  आजही माझ्या मनात अनेकदा शंका निर्माण करत असल्याचे सांगत तिचे हृतिकवर असलेल्या प्रेमाची तिला पुन्हा आठवण झाल्याचे पाहायला मिळाले. 

'केदारनाथ सिनेमातून' हिंदी चित्रपटसृष्टीत  पदार्पण केलेल्या सारा अली खानची सुशांतसह ऑनस्क्रीन केमिस्ट्री  पाहायला मिळाली. पदार्पणाच्या सिनेमापासून या ना त्या कारणामुळे सारा आणि सुशांतची जोडी चर्चेत राहिली. याच सिनेमाच्या दरम्यान साराची सुशांतसह चांगली मैत्रीही झाली. तसेच मैत्रीच्या पलीकडे त्यांचे नाते निर्माण झाल्याचे बोलले गेले. त्यांच्यात अफेअर असल्याच्याही चर्चा झाल्या. त्याच दरम्यान आई अमृता सिंहने लेक साराला सुशांतपासून थोडे लांबच राहण्याचे सांगितले. 

याच कारणामुळे  सारा आणि सुशांत यांच्यात मैत्रीचेही नाते राहिले नसल्याचे वेळोवेळी पाहायला मिळाले. त्यामुळेच खुद्द सुशांतनेच सारासह काम करण्यासही नकार दिल्याचे समोर आले होते. रिपोर्टनुसार सुशांतला एका जाहिरातीत सारासोबत काम करण्याची ऑफर मिळाली होती. मात्र सुशांतने जाहीरातीत काम करण्यास स्पष्ट नकार दिला असल्याची माहिती समोर आली होती.

टॅग्स :हृतिक रोशनकंगना राणौत