Join us  

शाहरुखच्या 'मैं हूं ना'मधील 'लकी'साठी हृतिक होता पहिली पसंती, सिनेमा नाकारण्यामागचं कारण आलं समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2024 7:59 PM

२००४ साली प्रदर्शित झालेला 'मैं हूं ना' (Main Hoon Na) हा चित्रपट शाहरुख खान(Shah Rukh Khan)च्या करिअरमधील सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक मानला जातो. दिग्दर्शक फराह खान(Farah Khan)च्या या चित्रपटाची कथा आणि गाण्यांनी चाहत्यांची मने चांगलीच जिंकली.

२००४ साली प्रदर्शित झालेला 'मैं हूं ना' (Main Hoon Na) हा चित्रपट शाहरुख खान(Shah Rukh Khan)च्या करिअरमधील सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक मानला जातो. दिग्दर्शक फराह खान(Farah Khan)च्या या चित्रपटाची कथा आणि गाण्यांनी चाहत्यांची मने चांगलीच जिंकली. आज २० वर्षांनंतरही मैं हूं ना या चित्रपटाचे रसिकांच्या मनातील स्थान कायम आहे. दरम्यान, फराह खानने चित्रपटाच्या स्टार कास्टबद्दल एक मोठा खुलासा केला आहे आणि तिने सांगितले की, मैं हूं ना या चित्रपटासाठी सुपरस्टार हृतिक रोशनला विचारण्यात आले होते.

नुकतीच फराह खानने रेडिओ मिर्चीला मुलाखत दिली. यादरम्यान ती शाहरुख खान स्टारर 'मैं हूं ना' या चित्रपटाबाबत खुलासा केला. 'मैं हूं ना' हा फराह खानचा दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट होता. या चित्रपटाबद्दल ती खूप उत्सुक होती. ती म्हणाली की, मैं हूं ना या चित्रपटासाठी मी हृतिक रोशनचा विचार केला होता. कहो ना प्यार है दरम्यान मी डान्स कोरिओग्राफर म्हणून काम करत होते आणि मला हृतिकचे टॅलेंट जाणवले होते. मी याबद्दल राकेश जी यांच्याशी बोलले आणि हृतिकला सांगितले की मी एका चित्रपटाची कथा (मैं हूं ना) लिहित आहे आणि त्यासाठी तू पहिली पसंती आहेस.

यात शाहरुख खानही मुख्य भूमिकेत आहे. शाहरुखचे नाव ऐकून हृतिकला खूप आनंद झाला आणि त्याने त्याला होकार दिला. त्यावेळी कहो ना प्यारचे शूटिंग सुरू होते. पुढे फराह खान म्हणाली की,मात्र जसाकहो ना प्यार है रिलीज झाला आणि त्यानंतर हृतिक रोशन रातोरात सुपरस्टार झाला. नंतर तो मैं हूं ना मधील सेकंड लीड भूमिका करायला तयार नव्हता. मग आम्ही झायेद खानला लकी म्हणून निवडले.

टॅग्स :हृतिक रोशनशाहरुख खान