Join us

कुठे गायब झाला ‘हम किसी से कम नहीं’चा हा चॉकलेटी हिरो?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2018 10:28 PM

‘हम किसी से कम नहीं’ या चित्रपटातील चॉकलेटी हिरो आठवतो? होय, तोच तो हातात गिटार घेऊन ‘क्या हुआ तेरा वादा’ हे गाणे गाणारा तारिक हुसैन खान. ज्याला अनेकजण तारिक खान नावानेही ओळखतात.

‘हम किसी से कम नहीं’ या चित्रपटातील चॉकलेटी हिरो आठवतो? होय, तोच तो हातात गिटार घेऊन ‘क्या हुआ तेरा वादा’ हे गाणे गाणारा तारिक हुसैन खान. ज्याला अनेकजण तारिक खान नावानेही ओळखतात. ‘हम किसी से कम नहीं’ हा चित्रपट ७० च्या दशकांत प्रचंड गाजला होता. हा तारिकचा तिसरा चित्रपट होता.१९७३ मध्ये ‘यादों की बारात’ या चित्रपटापासून तारिकने आपले अ‍ॅक्टिंग करिअर सुरू केले होते. त्याचा पहिलाच चित्रपट प्रचंड हिट राहिला. पण चित्रपट हिट होऊनही तारिकला याचा फारसा फायदा झाला नाही. यानंतर १९७५ मध्ये तारिकचा दुसरा चित्रपट ‘जख्मी’ रिलीज झाला. पण हा चित्रपट दणकून आपटला आणि तारिक स्टार बनता बनता राहिला. १९७७ मध्ये त्याला ‘हम किसी से कम नहीं’मध्ये संंधी मिळाली आणि हा चित्रपट त्याच्या करिअरमधील मैलाचा दगड सिद्ध झाला. यात त्याने सर्वोत्तम काम केले. या चित्रपटानंतर तरूणी जणू तारिकसाठी वेड्या झाल्यात. फार क्वचित लोकांना ठाऊक असेल की, तारिक खान हा सुपरस्टार आमिर खानचा कझिन आहे. ‘हम किसी से कम नहीं’नंतर तारिकला अनेक चित्रपट मिळाले. यश, लोकप्रीयता, ऐश्वर्या सगळे काही त्याच्या वाट्याला आले. पण काही वर्षानंतर अचानक त्याच्या यशाचा प्रवास थांबला. तारिक अचानक इंडस्ट्रीतून गायब झाला. 

करिअरमध्ये १५ चित्रपटात काम करणाऱ्या तारिकचा शेवटचा चित्रपट होता, ‘जेवर’. १९८७ मध्ये आलेल्या या चित्रपटानंतर तारिकला काम मिळणे बंद झाले. याचे कारण म्हणजे, याआधी आलेले त्याचे आलेले लागोपाठ सहा ते सात चित्रपट सुपर फ्लॉप ठरते. यानंतर ८ वर्षांनी तारिकने ‘मेरा दामाद’मधून पुन्हा कमबॅक केले. पण हा चित्रपटही आपटला आणि तारिकने इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतला. एका मुलाखतीत या निर्णयामागचे कारण त्याने सांगितले होते. त्या काळात मी स्वत:ला असुरक्षित समजू लागलो होतो. हे करिअर संपले आता एखादे सुरक्षित करिअर गरजेचे आहे, असे मला वाटले आणि मी इंडस्ट्री सोडली, असे त्याने सांगितले होते.आज तारिक काय करतोय तर एका नावाजलेल्या शिपमेंट कंपनीत सुपरवाईजिंग एक्झिक्युटिव्ह आहे. आज तारिक लाईमलाईटपासून पूर्णपणे दूर आहे आणि आपल्या छोट्याशा आयुष्यात आनंदी आहे.