एक सुंदर, चुलबुली आणि सावळ्या रंगाची अभिनेत्री. पहिल्याच चित्रपटातून तिच्या सौंदर्यांची आणि अदांची चर्चा झाली. कोणतीही पार्श्वभूमी नसताना तिला एका मोठ्या दिग्दर्शकाने त्याच्या चित्रपटातून लाँच केलं. पहिल्याच चित्रपटातून तिने पडद्यावर अधिराज्य गाजवलं. या चित्रपटात काम करण्यासाठी ती कॉलेज बुडवून शूटिंगला जायची. आपल्या पहिल्याच चित्रपटातून रातोरात स्टार बनलेल्या या अभिनेत्रीला चित्रपट समीक्षकांनी हिट चित्रपटाची फ्लॉप नायिका म्हटलं होतं.
या अभिनेत्रीचे वैयक्तिक आयुष्य नेहमीच गूढ राहिले आहे. तिच्या आई-वडिलांची कोणाला माहिती मिळाली नाही. ही अभिनेत्री कोण होती आणि तिचे आयुष्य खूप विचित्र का राहिले, आज आम्ही तुम्हाला याबद्दल सांगणार आहोत…
१३ वर्षांच्या करिअरमध्ये ४० चित्रपटांमध्ये केलं काम'है अल्लाह ये लड़का कैसा है दीवाना’ हे गाणे आठवते का, या गाण्यात दिसणारी अभिनेत्री म्हणजे काजल. काजलचं कोणतंच फिल्मी बॅकग्राऊंड नव्हतं. ८०च्या दशकात तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. काजलने तिच्या 13 वर्षांच्या छोट्या कारकिर्दीत जवळपास 40 चित्रपट केले आणि नंतर चित्रपटाने जगाला रामराम केला.
काजल किरणचा जन्म एक मध्यमवर्गीय महाराष्ट्रीयन कुटुंबात 18 ऑक्टोबर 1958 रोजी मुंबईत झाला. तिचे खरे नाव सुनीता कुलकर्णी होते, पण चित्रपटसृष्टीत आल्यानंतर तिने तिचं नाव बदललं. काजल किरणच्या आई-वडिलांबद्दल फारशी माहिती नाही, कारण एक तर ते फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित नव्हते आणि दुसरे म्हणजे, काजलने तिचे वैयक्तिक आयुष्यही खूप सीक्रेट ठेवले होते. काजल किरण ही तिच्या भावंडांमध्ये मोठी होती आणि तिला दोन लहान भाऊही होते. काजलने शिक्षण घेऊन डॉक्टर व्हावे, अशी तिच्या आई-वडिलांची इच्छा होती, पण तिचे मन अभिनयात होते.
शिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच काही मित्रांच्या सांगण्यावरून काजल किरणने तिचे फोटोशूट करून घेतले आणि अनेक कास्टिंग डायरेक्टर्सना पाठवले. ही प्रक्रिया काही दिवस सुरू राहिली. तिने अनेक स्टुडिओलाही भेट दिली आणि अनेक चित्रपटांसाठी निर्मात्यांची भेट घेतली. तेव्हा तिची भटे चित्रपट दिग्दर्शक नासिर हुसेनला भेटला. नासिरसाहेबांना तिची स्टायल, सुंदर डोळे आणि बोलण्याची पद्धत, सर्व काही आवडले आणि त्यांनी काजलला आपल्या चित्रपटासाठी साइन केले.