२०१९ मध्ये हैदराबादमध्ये एक सामुहिक बलात्काराचं Hyderabad rape case प्रकरण समोर आलं होतं. यात चार जणांनी एका मुलीवर बलात्कार करुन तिला जिवंत जाळलं होतं. या संतापजन्य प्रकारानंतर सोशल मीडियावर अनेकांनी निषेध व्यक्त केला होता. सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी या प्रकरणी दु:ख व्यक्त केलं होतं. मात्र, दु: ख व्यक्त करताना काही सेलिब्रिटींनी पीडित मुलीची ओळख आणि तिचे फोटो उघड केल्यामुळे (Celebrities reveal victim's identity) त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात अभिनेता सलमान खान, अक्षय कुमार यांच्यासह तब्बल ३८ सेलिब्रिटींवर गुन्हा दाखल झाला आहे.
बलात्कार पीडितेची ओळख किंवा तिचा फोटो उघड करणं हा कायद्याने गुन्हा आहे. मात्र, दु:ख व्यक्त करत असताना अनेक सेलिब्रिटींनी या पीडितेची ओळख उघड केली त्यांमुळे दिल्लीतील वकील गौरव गुलाटी यांनी या सेलिब्रिटींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दिल्लीतील सब्जी मंडी पोलीस ठाण्यात याविषयी फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी या प्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम 228A अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
'गंगूबाई काठियावाडी'सह, 'RRR' आणि 'अटॅक' चित्रपटगृहांमध्येच होणार रिलीज" सर्वसामान्यांसमोर आदर्श उदाहरण निर्माण करण्याऐवजी हे सेलिब्रिटी नियम मोडत आहेत. त्यामुळे संबंधित सेलिब्रिटींना अटक करण्यात यावी, अशी मागणी तक्रारकर्त्याने केली आहे.
या सेलिब्रिटींवर दाखल झाला गुन्हा
सलमान खान, अक्षय कुमार, अजय देवगण, रकुलप्रीत सिंह, फरहान अख्तर,अनुपम खेर, फरहान अख्तर, रवी तेजा, अल्लु सीरिश, चार्मी कौर यांच्यासह सेलिब्रिटींचाही यात समावेश आहे.