सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर निर्माते महेश भट्ट वादात सापडले आहेत. अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि महेश भट्ट यांचा सुशांतच्या मृत्युला काहीतरी कनेक्शन असल्याची शंका व्यक्त केली जात आहे. रिया चक्रवर्ती सुशांतसह राहत असली तरीही महेश भट्ट यांच्याशी रियाची चांगलीच जवळीक होती. यावरही त्यांनी "रिया मला वडिलांप्रमाणे मानते. मी रियाचा गुरु आहे. मी आणि रिया फक्त आणि फक्त कामाबद्दल चर्चा करतो. रिया आणि सुशांतच्या वैयक्तिक विषयांवर मी कधीच चर्चा केली नाही. आमच्यात सुशांतच्या नैराश्याच्या आजाराची फारशी चर्चा कधी झाली नव्हती", असेही भट्ट यांनी सांगितले होते. महेश भट्ट गेल्या काही महिन्यांत दोन मोठ्या वादात अडकले आहेत. एक सुशांतसिंग राजपूत मृत्यूप्रकरण आणि दुसरे ब्लॅकमेलिंग आणि लैंगिक शोषण. इतके दिवस मुग गिळून गप्प बसणारे महेश भट्टने मौन सोडले आहे. लैंगिक शोषण प्रकरणावर स्पष्टीकरण देत त्यांनी म्हटले आहे की, "मी 3 मुलींचा बाप आहे, जराही विचार न करता असले आरोप माझ्यावर लावले जात आहे. माझ्या नावाचा गैरवापर केला जात आहे."
तसेच आयएमजी वेंचर्स कंपनीचे प्रमोटर सनी वर्मा आणि 'मिस्टर अँड मिस ग्लॅमर २०२०' या कार्यक्रमाशी आपला काही संबंध नसल्याचे स्पष्ट केले होते. या महिन्याच्या सुरुवातीस, राष्ट्रीय महिला आयोगाने महेश भट्ट यांना समन जारी केला होता. कारण आयएमजी वेंचर्स आणि 'मिस्टर अँड मिस ग्लॅमर २०२०' या कार्यक्रमाच्या प्रमोशनसाठी महेश भट्टचा नाव समोर आले आहे.
मात्र तरीही महेश भट्ट होम प्रोडक्शनने यावर स्पष्टीकरण देत सांगितले की, आमच्या परवानगी शिवाय भट्ट यांच्या नावाचा गैरवापर केला गेला आहे. या घटनेशी किंवा लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात त्यांचा काही संबंध नाही. निवेदनात पुढे म्हटले आहे, 'जेव्हा याविषयी संबंधीत कंपनीसह संपर्क केला गेला तेव्हा त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आणि घटनेशी संबंधित माहिती काढून घेतली. वयाच्या 71 व्या सामाजिक कार्यात हातभार लावण्यावर विश्वास ठेवतो. मी तीन मुलींचा पिता आहे अशा प्रकारचे गैरव्यवहारबाबत माझ्या आरोप लावणे योग्य नाही असे सांगत भट्ट यांनी प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
महेश भट्ट दोन दशकांनंतर 'सडक' सिनेमाचा सीक्वल 'सडक 2' चे दिग्दर्शक रसिकांच्या भेटीला येत आहेत.या बहुचर्चित सिनेमात संजय दत्त, आलिया भट्ट, आदित्य रॉय कपूर, पूजा भट्ट, मकरंद देशपांडे आणि गुलशन ग्रोव्हर कलाकारांच्या भूमिका आहेत.