Join us

मुलं जन्माला घालण्यासाठी मी काही यंत्र नाही, सतत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांवर विद्या बालनचे प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2021 5:53 PM

माझे लग्न झाल्यापासून जवळचे सगळेच नातेवाईक सारखा एकच प्रश्न विचारत असतात. काळ जरी बदलला असला तरी मानसिकता मात्र तिच आहे हे यातून स्पष्ट होते.

वैविध्यपूर्ण आणि दर्जेदार तितक्याच संवेदनशील भूमिका साकारत रसिकांच्या काळजात अढळ स्थान मिळवलेली अभिनेत्री म्हणजे विद्या बालन. विविध सिनेमांतील भूमिकांनी चित्रपटसृष्टीत वेगळे स्थान मिळवलं आहे. आजवर विद्याने आपल्या दमदार अभिनयाने रसिकांची मनं जिंकली आहेत. 'परिणिता', 'लगे रहो मुन्नाभाई', 'डर्टी पिक्चर', 'पा','इश्किया', 'कहानी', 'कहानी-2' या आणि अशा कित्येक सिनेमातील विद्याने साकारलेल्या भूमिका रसिकांच्या मनात घर करुन आहेत. रसिकांची लाडकी विद्या सिद्धार्थ रॉय-कपूरसह रेशीमगाठीत अडकली. मात्र लग्नानंतरही विद्याची जादू कमी झालेली नाही. 

 अभिनेत्री विद्या बालनचा सिद्धार्थसह सुखाने संसार सुरु आहे. लग्नानंतर अनेकदा विद्याला खाजगी प्रश्न विचारले जातात. यावर एकदाच तिने सडेतोड उत्तर देत असे प्रश्न विचारणा-यांची कायमचीच बोलती बंद करुन टाकली आहे. तिच्या काही फोटोंमुळे विद्या प्रेग्नंट असल्याच्या वावड्या उठल्या होत्या.लग्न होत नाही त्याधीच लग्न कधी होणार असे प्रश्न पडतात ? लग्न झालं की मग मुलं कधी होणार ? असे प्रश्न सतत महिलांनाच का विचारले जातात. समाजात आजही अशी मानसिकता असणा-यांबद्दल विद्या बालनने राग व्यक्त केला होता. 

वारंवार विचारण्यात येणाऱ्या प्रेग्नेंसीच्या प्रश्नामुळे विद्या प्रचंड वैतागली होती.एका मुलाखतीमध्ये म्हटलं होतं की, ‘मी मूल जन्माला घालणारं यंत्र नाही’. लग्नानंतर वाढलेले वजन आणि डॉक्टरांकडे काही कारणास्तव जावेही लागते याचा अर्थ असा होत नाही की मी प्रेग्नंट आहे. खरंच आपल्याकडे लग्न झाले की, मुलं जन्माला घालण्यासाठी असा काही दबाव निर्माण केला जातो तो केवळ वेडेपणा आहे. आधीच जगाची लोकसंख्या ही चिंतेत टाकणारी आहे. त्यात काहींनी जर मुंल जन्माला नाही घातली तर काय फरक पडतो.

माझ्या लग्नाच्याच दिवशी माझ्याच काकांनी मला सांगितले होते की, पुढच्यावेळीस जेव्हा भेटू तेव्हा दोनाचे तीन झालेले असावेत.काकांच्या अशा बोलण्यावर हसूच येत होतं कारण लग्नानंतर मी आणि सिद्धार्थने हनिमूनसाठी कुठे जायचे याचा देखील विचार केलेला नव्हता. माझे लग्न झाल्यापासून जवळचे सगळेच नातेवाईक सारखा एकच प्रश्न विचारत असतात. काळ जरी बदलला असला तरी मानसिकता मात्र तिच आहे हे यातून स्पष्ट होते. 

टॅग्स :विद्या बालन