एकेकाळी बॉलिवूड गाजवणारी अभिनेत्री पूजा भट्ट (pooja bhatt) हिचा आता कलाविश्वातील वावर पूर्णपणे कमी झाला आहे. कोणत्याही सिनेमात पूजा काम करत नसली तरीदेखील ती चाहत्यांच्या चर्चेचा विषय ठरत असते. अलिकडेच ती बिग बॉस ओटीटी २ मध्ये झळकली होती. या शोमध्ये परखड मत आणि सकारात्मक विचार यांमुळे पूजाची बरीच चर्चा झाली. सोबतच तिचं प्रोफेशनल आणि खासगी आयुष्य सुद्धा चर्चेत राहिलं. यामध्येच आता पूजाने वडिलांसोबत केलेल्या लिपकिसवर भाष्य केलं आहे.
1990 मध्ये पूजा भट्ट आणि वडील महेश भट्ट (mahesh bhatt) यांनी लिपकिस केलं होतं. त्यांच्या या प्रकारावर नेटकऱ्यांनी या बापलेकीला चांगलंच ट्रोल केलं होतं. एका मॅगझीनवर त्यांचा फोटो छापून आला होता. या घटनेला बरीच वर्ष झाली. मात्र, आजही हा मुद्दा चर्चिला जातो. याच प्रकरणी आता पूजाने स्पष्टीकरण दिलं आहे.
"मला अजिबात या सगळ्याचं दु:ख नाहीये. कारण, मी या सगळ्याकडे एक नॉर्मल गोष्ट म्हणून पाहते. पण, मला या गोष्टीचं वाईट वाटतं, जेव्हा तुमचा एखादा क्षण लोक चुकीच्या पद्धतीने दाखवतात किंवा त्यावर भाष्य करतात. मला आठवतंय शाहरुखने मला सांगितलं होतं. जेव्हा तुला लहान मुलगी होईल किंवा तुझी लहान मुलं असतील ते किती वेळा आई-वडिलांना किस करायला सांगतात बघ. त्यामुळे मी आजही स्वत:ला लहान समजते", असं पूजा म्हणाली.
पुढे ती म्हणते, "मी या वयात सुद्धा माझ्या वडिलांसाठी तीच १० पाऊंडाची लहान मुलगी आहे. आणि, आयुष्यभर त्यांच्यासाठी लहानच राहीन. हा तर एक किरकोळ क्षण होता जो कॅमेरात कैद झाला. आणि, त्याला चुकीच्या पद्धतीने दाखवलं गेलं. याविषयी ज्याला चे वाचायलंय ते वाचू दे. ज्याला जे दाखवायचंय ते दाखवू दे. मी या सगळ्यांची उत्तर द्यायला बांधील नाही. एकीकडे लोक कुटुंबाचं महत्त्व सांगत फिरतात आणि दुसरीकडे बाप-लेकीचं नातं चुकीच्या पद्धतीने दाखवतात. मजेशीर विनोद आहे."