सैफ अली खानची मुलगी सारा अली खान हिचा डेब्यू सिनेमा ‘केदारनाथ’ रिलीजसाठी तयार आहे. सैफची बेटर हाफ करिना कपूर खानही साराच्या डेब्यूबद्दल उत्सूक आहे. काही दिवसांपूर्वी करण जोहरच्या ‘कॉफी विद करण 6’मध्ये सारा सावत्र आई करिनाबद्दल भरभरून बोलली होती. आता मात्र करिना कपूर साराबद्दल बोलली आहे. होय,मुंबई मिररला दिलेल्या मुलाखतीत करिना कपूरने सैफ व अमृता सिंग यांच्या सारा आणि इब्राहिम या मुलांबद्दल भाष्य केले.
मी कधीही सारा आणि इब्राहिमची आई होऊ शकत नाही, असे करिना म्हणाली. ‘मी आणि सारा-इब्राहिम केवळ चांगले मित्र होऊ शकतो. मी त्यांची आई कधीही बनू शकणार नाही, हे मी सैफला लग्नाआधीच सांगितले होते. कारण सारा व इब्राहिमजवळ आधीच अमृतासारखी चांगली आई आहे. तिने त्या दोघांना अतिशय प्रेमाने वाढवले आहे. मी केवळ सारा व इब्राहिमला प्रेम करू शकते. त्यांची मैत्रिण बनू शकते. त्यांची आई होणे मला जमणार नाही. त्यांना जेव्हा केव्हा माझी मदत आणि सल्ला लागेल, त्यावेळी मी कायम त्यांच्यासोबत असेल,’असे करिना यावेळी म्हणाली.