Join us

शबाना आझमी या अभिनेत्रीला मानतात आपली मुलगी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2018 6:30 AM

शबाना आझमी यांना नुकतेच स्टार स्क्रीन ॲवॉर्ड्‌समध्ये जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार त्यांना एका विशेष व्यक्तीच्या हातून मिळाला असल्याने त्या प्रचंड खूश झाल्या होत्या.

ठळक मुद्देउर्मिला ८ वर्षांची असताना मी तिला मासूमच्या सेटवर पहिल्यांदा भेटले आणि अगदी पहिल्याच दिवशी मी दिग्दर्शकांना सांगितलं होतं की, ही मुलगी मोठी होऊन एक यशस्वी अभिनेत्री बनेल. त्या चित्रपटात ती माझी मुलगी होती, आजही वास्तविक आयुष्यात मी तिला माझी मुलगीच मानते.

बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांनी ‘अंकुर’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतरच्या आपल्या करिअरमध्ये त्यांनी १३० हून अधिक व्यावसायिक आणि समांतर चित्रपटांत दर्जेदार भूमिका साकारल्या. अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपटांतही त्यांनी भूमिका वठवल्या आहेत. 

‘जुनून’, ‘शतरंज के खिलाडी’, ‘कंधार’, ‘स्पर्श’, ‘पार’, ‘सती’, ‘अर्थ’, ‘गॉडमदर’ इत्यादी एका पेक्षा एक सरस अशा चित्रपटांमधून त्यांनी आपल्या अभिनयाची चुणूक दाखवून दिली आहे. जॉन श्लेसिंगर यांचा ‘मॅडम सोऊसाटस्का आणि रोनाल्ड जॉफ यांचा ‘सिटी ऑफ जॉय या हॉलिवूड चित्रपटांमधून त्यांनी अभिनय केला आहे. कवी आणि पटकथाकार जावेद अख्तर यांची पत्नी असलेल्या शबाना आझमी अभिनय करण्याबरोबर सामाजिक चळवळीतदेखील सक्रिय असतात. त्यांना नुकतेच स्टार स्क्रीन ॲवॉर्ड्‌समध्ये जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार त्यांना एका विशेष व्यक्तीच्या हातून मिळाला असल्याने त्या प्रचंड खूश झाल्या होत्या.

उर्मिला मातोंडकरने शबाना आझमी यांच्यासोबत मासूम या चित्रपटात काम केले होते. या चित्रपटात उर्मिला बालकलाकाराच्या भूमिकेत होती. या चित्रपटात शबाना यांच्यासोबतच नसिरुद्दीन शहा यांची मुख्य भूमिका होती. या चित्रपटाला आज अनेक वर्षं होऊन गेली असली तरी शबाना आणि उर्मिला यांच्याच तितकेच घट्ट नाते आहे. शबाना मासूम या चित्रपटापासूनच उर्मिलाच्या कामाच्या चाहत्या राहिलेल्या आहेत.

स्टार स्क्रीन ॲवॉर्ड्‌स २०१८ या पुरस्कार सोहळ्यात उर्मिला मातोंडकरच्या हस्ते शबानाजींना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार स्वीकारताना शबाना आझमी यांनी उर्मिलाचे भरभरून कौतुक केले. त्या म्हणाल्या, “उर्मिला ८ वर्षांची असताना मी तिला मासूमच्या सेटवर पहिल्यांदा भेटले आणि अगदी पहिल्याच दिवशी मी दिग्दर्शकांना सांगितलं होतं की, ही मुलगी मोठी होऊन एक यशस्वी अभिनेत्री बनेल. त्या चित्रपटात ती माझी मुलगी होती आणि आजही वास्तविक आयुष्यात मी तिला माझी मुलगीच मानते.”

स्टार स्क्रीन ॲवॉर्ड्‌स हा पुरस्कार सोहळा प्रेक्षकांना ३१ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजता स्टार प्लसवर पाहायला मिळणार आहे. 

 

टॅग्स :शबाना आझमीउर्मिला मातोंडकर