मला कुठलीही प्रसिद्धी नकोय, शांती हवीय! अमिताभ बच्चन यांची मीडियाला विनंती!!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2017 4:57 AM
अमिताभ बच्चन आपल्या मनातील गोष्टी अनेकदा सोशल मीडियावर शेअर करत असतात. आता पुन्हा एकदा त्यांनी असाच एक लांबलचक ब्लॉग ...
अमिताभ बच्चन आपल्या मनातील गोष्टी अनेकदा सोशल मीडियावर शेअर करत असतात. आता पुन्हा एकदा त्यांनी असाच एक लांबलचक ब्लॉग लिहिला आहे. या ब्लॉगची सुरूवात त्यांनी धर्म, आस्था आणि तर्क या विषयांपासून केली. पण पुढे याच ब्लॉगमध्ये त्यांनी मीडियाच्या कामाची समीक्षा केली आहे. केवळ इतकेच नाही तर बीएमसीने त्यांना पाठवलेल्या अवैध बांधकामाच्या नोटीसचाही उल्लेख केला आहे. याच ब्लॉगमध्ये त्यांनी मीडियाच्या स्वातंत्र्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलेयं. ‘अलीकडे मीडिया आधीच्या तुलनेत बराच स्वतंत्र आहे. त्यावर कुठलाही प्रतिबंध नाही. इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिन्टच्या तुलनेत अधिक वेगवान झालायं. सकाळी वृत्तपत्रात येणाºया बातम्या तुम्ही रात्रीचं इंटरनेटवर वाचू शकता. सोशल मीडियाचे एक वाक्य हेडलाईन्स बनते. त्यामुळे मीडियाने प्रश्न विचारल्यावर तुम्हाला प्रतिक्रिया देणे भाग पडते. मी सुद्धा याचप्रकारे प्रतिक्रिया देतोयं,’ असे अमिताभ यांनी लिहिले.यानंतर त्यांनी अवैध बांधकामासंदर्भात त्यांना बजावण्यात आलेल्या नोटीसचा उल्लेख केला आहे. ‘हे मी स्वत:साठी म्हणतोय. अनेक बाबतीत शांत राहणेच योग्य वाटते. पण अनेक ठिकाणी चुका दुरूस्त कराव्या लागतात. मीडियाला प्रतिक्रिया दिल्याने समस्येचे समाधान मिळते का? हा मुद्दा अर्थात आहेच. (अवैध बांधकामाच्या नोटीसप्रकरणी) प्रशासकीय स्तरावर तोडगा निघणार. मीडिया स्तरावर नाहीच. त्यामुळे आधी चौकशी-तपास अशी सगळी प्रक्रिया पूर्ण होऊ द्या,’ असे त्यांनी लिहिलेयं. ते केवळ इथेच थांबले नाही तर त्यांनी बोफोर्सपासून पनामा पेपर्स लीकपर्यंतच्या सर्व प्रकरणांवर आपल्या भावना बोलून दाखवल्या आहेत. त्यांनी लिहिलेयं, ‘माझ्या व माझ्या कुटुंबावर बोफोर्स प्रकरणात आरोप केले गेले. अनेक वर्षे आम्हाला या प्रश्नांचा सामना करावा लागला. अखेर संयम संपल्यावर आम्ही न्यायासाठी ब्रिटनच्या कोर्टात गेलो आणि तेथे आम्हाला न्याय मिळाला.’ याच पोस्टच्या शेवटी त्यांनी मीडियाला उद्देशून मला कुठलीही प्रसिद्धी नकोय, असे लिहिलेयं. ‘या वयात मला कुठल्याही प्रकारच्या ख्यातीपेक्षा शांती हवी आहे. आपल्या आयुष्याची आणखी काही वर्षे मला स्वत:सोबत जगायची आहेत. मला कुठलीही प्रसिद्धी नकोय. मी या प्रसिद्धीच्या लायकीचा नाही. मला कुठलीही ओळख नकोय. मी त्यास पात्र नाहीय...’ असे त्यांनी लिहिले आहे.यापलीकडेही अमिताभ यांनी या ब्लॉगमध्ये बरेच काही लिहिले आहे. काही दिवसांपूर्वी अमिताभ यांच्या गोरेगावस्थित बंगल्यातील अवैध बांधकामप्रकरणी बीएमसीनेत्यांना नोटीस पाठवली होती. या अवैध बांधकामाचा खुलासा आरटीआयद्वारे झला होता.ALSO READ: ‘या’ अभिनेत्रीमुळे अमिताभ बच्चनचे मर्सिडीजमध्ये बसण्याचे स्वप्न झाले पूर्ण!खाली वाचा,अमिताभ यांचा ब्लॉग त्यांच्याच शब्दांत...