Join us

Deepika Padukone : भगव्या बिकनीनंतर दीपिका पादुकोणच्या वर्ल्ड कप स्पर्धेतील ड्रेस चर्चेत; भाजपा प्रवक्ता म्हणते साडी नेसायला हवी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2022 12:33 PM

Deepika Padukone Football World Cup trophy : बेशरम रंग... पठाण चित्रपटालीत गाण्यात दीपिका पादुकोणच्या भगव्या बिकनीमुळे वाद झाला...

Deepika Padukone Football World Cup trophy : बेशरम रंग... पठाण चित्रपटालीत गाण्यात दीपिका पादुकोणच्या भगव्या बिकनीमुळे वाद झाला... हिंदूंच्या भावना दुखावल्याचे आरोप झाले अन् अनेक हिंदू संघटनांनी चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची भाषा केली. काल परवा एका साधूने तर शाहरुख खानला जीवंत जाळण्याची धमकी दिली. देशात टीका सुरू असताना अभिनेत्री दीपिका पादुकोण फिफा वर्ल्ड कप फायनलसाठी कतार येथे पोहोचली अन् तिच्या हस्ते फुटबॉल वर्ल्ड कप चषकाचे अनावरण करण्यात आले. आतापर्यंत एकाही बॉलिवूडच नव्हे तर जगातील  अभिनेत्रीला हा मान मिळाला नव्हता आणि तो दीपिकाला मिळाला. यामुळे तिचे चाहते आनंदात आहेतच, शिवाय भारतीयांसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. पण, बिकनी वादानंतर आता दीपिकाने चषक अनावरण करताना घातलेल्या ड्रेसवरून भाजपा प्रवक्त्याने आक्षेप घेतला आहे.

दीपिका अनेक ग्लोबल ब्रँड्सची सदिच्छादूत आहे. फिफा वर्ल्ड कपच्या ट्रॉफीची पेटी ग्लोबल ब्रँड लुई व्हिटॉनने डिझाईन केली आहे आणि दीपिका या ब्रँडची सदिच्छादूत आहे. म्हणून दीपिकाला हा मान मिळाला. यावेळी दीपिकाने गोल्डन जॅकेट आणि काळ्या रंगाचा स्कर्ट घातला होता.

दिल्लीतील भाजपा प्रवक्त्या निघट अब्बासने ट्विट केले की, '' दीपिकाने काहीही परिधान करायला हरकत नाही पण एक "भारतीय अभिनेत्री" म्हणून ट्रॉफीचे अनावरण केल्याबद्दल भारतीयांना अभिमान वाटावा असे तिला वाटत असेल, तर तिने पाश्चात्य पोशाख नव्हे तर साडी नेसायला हवी होती. ती तिथं स्पष्टपणे तिच्या चित्रपटाचं प्रतिनिधित्व करत होती भारताचं नाही!'' 

ज्येष्ठ अभिनेत्री रत्ना पाठक यांनी पठाण सिनेमाच्या वादावर आपले मत व्यक्त केले. रत्ना पाठक म्हणतात, 'अनेक लोकांच्या ताटात अन्न नाही पण त्यांच्याकडे आपलं लक्ष नाही. कोणी काय कपडे घातले यावर लोक संताप व्यक्त करत आहेत. हा मुद्दा तुमच्या डोक्यात सगळ्यात आधी येतोय, जर तुम्ही हाच विचार करत असाल तर आपण चुकीचे करत आहोत. ही वेळच चुकीची आहे. हा असा मुद्दा नाहीये ज्याला मी फार महत्व देईन. यावर जास्त बोलायचीही माझी इच्छाही नाहीये.'

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"   

टॅग्स :दीपिका पादुकोणपठाण सिनेमाफिफा फुटबॉल वर्ल्ड कप २०२२भाजपा