बॉलिवूडमध्ये एंट्री करताच पहिल्याच सिनेमातून आज अभिनेत्रींना पुरस्कार, प्रसिद्धी, प्रतिष्ठा सारं काही मिळतं. अर्थात त्याच्यापाठी मेहनतीही तितकीच असते. पण सारेच मेहनती असतात. मेहनतीचे फळ हे मिळतेच हे सारे खरं असलं तरी काहींच्या बाबतीत मात्र ते जरा उशीराच घडतं. आणि नंतर खंत व्यक्त करण्यापलीकडे काहीही उरत नाही. असेच काहीशी खंत अभिनेत्री शिल्पा शेट्टीनेही व्यक्त केली आहे. बॉलिवूडमध्ये इतक्या वर्षानंतर शिल्पाला एका गोष्टीची खंत वाटते. . 'फिर मिलेंगे' आणि 'धड़कन' सिनेमाला रसिकांनी भरभरून प्रेम दिलं. सिनेमात शिल्पा शेट्टीच्या भूमिकेला विशेष पसंतीही मिळाली. मात्र तरीही शिल्पाला या सिनेमासाठी एकही पुरस्कार मिळाला नाही. हीच गोष्ट तिने पहिल्यांदा एका कार्यक्रमा दरम्यान व्यक्त केली.
अनेक सिनेमात चांगल्या ऑफर्सही मिळाल्या. कधी कधी विचारही करते की मला इतक्या सिनेमात काम करण्याची संधी मिळाली तरी कशी ? मात्र माझा नशीबावर खूप विश्वास आहे. लूक्स, अभिनयकौशल्य असूनही जर नशीब साथ देत नसेन तर कितीही मेहनत केली तरी फळ मिळणे अशक्य. माझ्या नशीबामुळे मला आजपर्यंत बॉलिवूडमध्ये काम करण्याची संधी मिळाल्याचेही तिने सांगितले. स्ट्रगल हे कोणालाही चुकलेले नाही.करिअरच्या सुरुवातीला प्रचंड स्ट्रगल सहन करावा लागला.
स्ट्रगल करण्यातही खूप मजा होती. मला जर करिअरच्या सुरूवातीला अपयश नसते मिळाले. तर कदाचित इतके वर्ष बॉलिवूडमध्ये राहिले नसते.त्यामुळे माझ्या बॉलिवूड कारकिर्दीत यशापेक्षा अपयशाचा जास्त वाटा असल्याने मी आज स्वतःला यशस्वी आणि सक्षम अभिनेत्री समजते असेही शिल्पाने सांगितले.