जणू माझ्या मुलांवर हल्ला होतोय, असे मला वाटत होते.... ! ‘पद्मावत’ वादावर बोलले संजय लीला भन्साळी !!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2018 5:22 AM
‘पद्मावत’ बॉक्सआॅफिसवर धूम करतोय. या यशाने ‘पद्मावत’चे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी जाम खूश आहे. दीर्घ संघर्षानंतर ‘पद्मावत’ रिलीज झाला. ...
‘पद्मावत’ बॉक्सआॅफिसवर धूम करतोय. या यशाने ‘पद्मावत’चे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी जाम खूश आहे. दीर्घ संघर्षानंतर ‘पद्मावत’ रिलीज झाला. रिलीज होताच प्रेक्षकांच्या या चित्रपटावर उड्या पडल्यात. गेल्या दहा दिवसांत या चित्रपटाने १५० कोटी रूपयांची कमाई केली आहे. या संपूर्ण पार्श्वभूमीवर या चित्रपटाशी जुळलेले काही अनुभव भन्साळींनी शेअर केलेत. ‘पद्मावत’ला झालेल्या विरोधावरही ते बोलले. ‘पद्मावत’ ला प्रचंड विरोध झाला. या काळात जणू माझ्या मुलांवर हल्ला होतोय आणि मी त्यांचा बचाव करतोय, असे मला वाटत होते. पण रिलीजमुळे मी खूश आहे. ‘पद्मावत’साठी दीर्घ संघर्ष करावा लागला. एक ते दीड वर्षे हा मोठा कालावधी आहे. कदाचित जगातील कुठल्याही कोप-यात एखाद्या चित्रपटाला रिलीजसाठी इतका मोठा संघर्ष करावा लागला नसेल. अशावेळी अनेकांचा धीर सुटतो. लोक मागे हटतात. माझ्या बाबतीत सांगायचे तर ‘पद्मावत’चा हा संघर्ष हिमालय पर्वत चढण्यासारखा होता. ज्यात अनेक वादळांना तोंड देत पर्वताचे टोक गाठावे लागते. पण हा माझ्या प्रवासाचा भाग आहे आणि प्रवासात असे टप्पे येतचं असतात, असे भन्साळी म्हणाले.ALSO READ : संजय लीला भन्साळींच्याच चित्रपटांवर वाद का?माझ्या चित्रपटाला विरोध झाला. पण मी त्यावर फार लक्ष दिले नाही. मी केवळ चित्रपट बनवण्यावर माझे सगळे लक्ष केंद्रीत केले. माझे माझ्या कामावर प्रेम आहे. याशिवाय मला दुसरे कुठलेही काम येत नाही. याच कामासाठी मी जगतोय आणि मरायलाही तयार आहे, असेही भन्साळी म्हणाले.बॉलिवूडमधील करिअरला २५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दलही ते बोलले. हा प्रवास सोपा नक्कीच नव्हता. पण मी न थांबता या प्रवासाला निघालो. या प्रवासात मला अनेक चांगल्या व्यक्ती भेटल्या. काहींनी मला मागे ओढण्याचेही प्रयत्न केलेत. पण त्यांच्या या प्रयत्नांना मी कायम सकारात्मक अंगाने घेतले. माझे काम मी पूर्णपणे एन्जॉय केले, असे भन्साळींनी सांगितले.