मला ही हिरोइतकेच मानधन मिळते
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2016 6:16 PM
बॉलिवूड चित्रपटसृष्ट्रीत नेहमीच हिरो आणि हिरोईन यांच्या मानधनचा प्रश्न रंगलेला दिसत असतो. त्याचप्रमाणे कोणाला कोणापेक्षा जास्त मानधन मिळते हा ...
बॉलिवूड चित्रपटसृष्ट्रीत नेहमीच हिरो आणि हिरोईन यांच्या मानधनचा प्रश्न रंगलेला दिसत असतो. त्याचप्रमाणे कोणाला कोणापेक्षा जास्त मानधन मिळते हा विषयदेखील सातत्याने चर्चेस असतो. आता हेच पाहा ना, चित्रपटसृष्टीमध्ये काम करणाºया कलाकारांच्या वाट्याला येणारी प्रसिद्धी आणि एकंदर बी टाऊनचे वातावरण पाहता, बॉलिवूडमध्ये कलाकारांना एखाद्या चित्रपटासाठी किती रुपयांचे मानधन मिळते याबद्दलचा निश्चित आकडा कधीही सहजासहजी कोणासमोर उघड केला जात नाही. त्याचप्रमाणे हिरोईनला हिरोपेक्षा कमी मानधन मिळते याविषयावरदेखील अनेक वाद गाजले आहेत. आता याविषयी बॉलिवुडची तगडी अभिनेत्री रिचा चड्डानेदेखील आपले मत मांडले आहे. ती म्हणते, चित्रपटातील एखाद्या पुरुष सहकलाकाराच्या मानधनाएवढीच रक्कम आपल्यालाही मिळत असल्याचे तिने सांगितले आहे.चित्रपटाच्या वाट्याला येणाºया यशावरच बॉलिवूडमध्ये मानधन निश्चित केले जाते. इथे कधीही तुमच्या कौशल्यावरुन आणि तुमच्या अनुभवाच्या अनुशंगाने मानधनाचा आकडा ठरत नाही, असे रिचाने स्पष्ट केले. यापुढे बोलताना रिचा असेही म्हणाली की, मला आठवतंय, कहानी या चित्रपटानंतर विद्या बालनने अभिनेता इम्रान हाश्मीसोबतच्या ह्यृघनचक्कर या चित्रपटासाठी होकार दिला होता. हा एक मोठा व्यवहार होता. त्यामुळे, तिला चित्रपटातील सहकलाकाराएवढेच मानधन देण्यात आले होते. मला असं वाटतं की बॉलिवूडमध्ये बॉक्स आॅफिसला सर्वाधिक महत्त्व दिलं जातं. रिचाने बॉलीवूडला फुकरे, शॉटर्स, सरबजीत, गोलिंयो की रासलीला रामलीला, गॅगस आॅफ वासेपुर, ओय लकी लकी ओय असे अनेक चित्रपटदेखील तिने केले आहेत. तिने नेहमीच आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे.