Join us

'मला तो आवडतो, पण...'; शमिताने दिली राकेशवरच्या प्रेमाची कबुली?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2021 13:18 IST

BB OTT: या दोघांमधील प्रेम दिवसागणित खुलत असून आता त्यांच्यातील अंतर कमी होताना दिसत आहे.

ठळक मुद्दे'राकेश आवडतो का?' नेहाच्या प्रश्नावर शमिताने दिली कबुली

अलिकडेच सुरु झालेला 'बिग बॉस ओटीटी' Bigg Boss OTT हा रिअॅलिटी शो सध्या चांगलाच गाजताना दिसत आहे. अभिनेत्री शिल्पा शेट्टीची Shilpa Shetty बहीण शमिता शेट्टी Shamita Shetty या शोमध्ये सहभागी झाल्यापासून सातत्याने विविध कारणांमुळे चर्चेत येत आहे. त्यातच आता बिग बॉसच्या घरात आणि चाहत्यांमध्ये शमिता आणि अभिनेता राकेश बापट Raqesh Bapat यांच्या रिलेशनची जोरदार चर्चा रंगू लागली आहे. बऱ्याचदा हे दोघ घरात एकमेकांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवताना दिसतात. त्यामुळे या दोघांमध्ये नक्कीच कोणतं तरी नातं आहे अशी चर्चा नेटकऱ्यांमध्ये रंगू लागली आहे. त्यातच आता शमिताने राकेश आवडत असल्याची कबुली दिली आहे.

'बिग बॉस ओटीटी' हा शो सुरु झाल्यापासून राकेश आणि शमिता यांच्यात चांगली बाँडिंग निर्माण झाली आहे. त्यामुळे ही जोडी प्रेक्षकांनादेखील विशेष आवडताना दिसत आहे. विशेष म्हणजे या दोघांमधील प्रेम दिवसागणित खुलत असून आता त्यांच्यातील अंतर कमी होताना दिसत आहे. याच दरम्यान, शमिताने नेहा भसीन Neha Bhasin समोर तिच्या प्रेमाची कबुली दिली आहे. "राकेश मला आवडतो. मात्र, तो कन्फ्युज वाटतो", असं शमिता म्हणाली. नेहा आणि शमिताच्या या संभाषणाचा व्हिडीओ वूटने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे.

सिद्धार्थसाठी Prayer Meetचं आयोजन; या पद्धतीने चाहत्यांना होता येईल सहभागीव्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये नेहाने शमिताला थेट 'राकेश आवडतो का?' असा प्रश्न विचारला त्यावर शमितानेदेखील तिच्या प्रेमाची कबुली दिली. "आम्ही खरंच एकमेकांना आवडतो. तो खूप गोड आहे. पण, मला कधी कधी असं वाटतं तो फार कन्फ्युज आहे आणि हेच माझ्यासाठी थोडं डिस्टर्ब करणारं आहे. कारण, मी अजिबात कन्फ्यूज नाहीये.  माझ्या डोक्यात एखादी गोष्ट आली तर मी त्या गोष्टीवर ठाम राहते", असं शमिता म्हणाली.

दरम्यान, राकेशच्या याच स्वभावामुळे शमिता गेल्या काही दिवसांपासून त्याच्यासोबत राहण्याचं टाळत आहे.मात्र, या दोघांच्या नात्यात नेमकं काय होणार? त्यांच्यातील मैत्री याच प्रकारे कायम राहणार की तुटणार असे अनेक प्रश्न सध्या चाहत्यांना पडले आहेत.