लोकमत न्यूज नेटवर्क
आक्षेपार्हकडे घातल्याच्या आरोपांवरून वादाच्या भोवऱ्यात अडकलेली उर्फी जावेद शनिवारी अंबोली पोलठाण्यात हजर झाली. मला असेच कपडे घालायला आवडतात आणि राज्य घटनेच्या दृष्टीने हा काही गुन्हा नाही, असे तिने पोलिसांना सांगितले. पेहरावाच्या मुद्द्यावरून भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी गेल्या काही दिवसांपासून उर्फीला लक्ष्य केले आहे. वाघ यांनी उर्फीविरोधात तक्रार केल्यानंतर तिला अंबोली पोलिसांनी समन्स धाडले होते. त्यानुसार, शनिवारी उर्फी पोलिस ठाण्यात हजर झाली.
मला असेच कपडे परिधान करायला आवडतात आणि हा काही गुन्हा नाही, असे तिने चौकशीदरम्यान जबाबात पोलिसांना सांगितले. महिला पोलिस निरीक्षकाने उर्फीचा जबाब नोंदविला.
- या आधी दाखल केलेल्या तक्रारीला उत्तर म्हणून उर्फीनेही वकील नितीन सातपुते यांच्यामार्फत चित्रा वाघ यांच्याविरुद्ध आयपीसीच्या १५३(अ), ५०४, ५०६ आणि ५०६ (ii) या कलामांतर्गत धमकी दिल्याबद्दल गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती.