मुंबई - आपण आयुष्यात कधीही ड्रग्ज सेवन केले नाही की त्यासाठी कोणाला प्रोत्साहन दिले आहे. याप्रकरणी अटक केलेल्या क्षितीज प्रसादचा आपल्याशी किंवा व धर्मा प्रॉडकशनशी कसलाही संबंध नाही, असे स्पष्टीकरण प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहर याने केला आहे. मीडियातून याबाबत खोट्या व बिनबुडाच्या दिल्या जाणाऱ्या बातम्या न थांबविल्यास कारवाई करण्याचा इशाराही त्याने दिला आहे.
करण जोहरने सोशल मीडियावर शुक्रवारी एक निवेदन देऊन आपली बाजू मांडली आहे. त्यात म्हटले आहे की, गेल्या वर्षाच्या पार्टीतील व्हायरल व्हिडिओबाबतचे आरोप खोटे आहेत. त्यामध्ये ड्रग्जचा वापर झालेला नव्हता. मी मादक पदार्थांचे सेवन करीत नाही किंवा अशा कोणत्याही पदार्थाच्या वापरास प्रोत्साहन देत नाही. "काही वृत्तवाहिन्या, प्रिंट आणि सोशल मीडिया जाणीवपूर्वक चुकीची माहिती देऊन दिशाभूल करीत आहेत, हा प्रकार निदनीय ड्रग तस्करीप्रकरणात अटक केलेल्या क्षितीज रवी प्रसाद आणि अनुभव चोप्रा यांना आपण ओळखतही नाही त्यांचा धर्मा प्रॉडक्शनशी कसलाही संबंध नाही, क्षितीज प्रसाद याला नोव्हेंबर 2019 मध्ये धर्मा प्रॉडक्शनशी संबधित धर्माटिक एंटरटेनमेंट मध्ये सामील केले आणि अखेर ते साकार न एका प्रोजेक्टसाठी सह दिग्दर्शक म्हणून करार केला होता. मात्र तो पूर्णच होऊ शकला नाही त्यामुळे त्याच्याशी कसलाही संबंध येत नाही.