Join us

'दम लगाके हैशा'नंतर मी पुन्हा मागे वळून पाहिलेच नाही-आयुष्यमान खुराना

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2021 4:28 PM

विकी डोनर आणि त्यानंतर डीएलकेएचच्या यशाने मला प्रेक्षकांना थिएटरमध्ये एका वेगळ्या अनुभूतीची आवश्यकता असल्याचे आणि त्यांची आवड बदलत असल्याचे सांगितले.

बॉलिवुड स्टार आयुष्यमान खुरानाला आता ’भारतीय कंटेट सिनेमाचा पोस्टर बॉय’ संबोधले जाते. प्रक्षोभक आणि पठडीबाहेरच्या आगळ्या-वेगळ्या सिनेमा ब्रॅंडसह त्याच्या स्टारडमच्या प्रवासाला महत्वाचे वळण देणा-या २०१५च्या दम लगाके हैशा या क्लटर-ब्रेकींग फिल्मला तो सगळे श्रेय्य देतो. या चतुरस्त्र अभिनेत्याने स्क्रीनवर लागोपाठ आठ हिट्स दिल्या आहेत. ”दम लगाके हैशा माझ्या करियरच्या सर्वात अविस्मरणीय चित्रपटांपैकी एक असेल, त्याची अनेक कारणे आहेत. यामुळे मी संवाद घडवून आणणारे चित्रपट स्वीकारण्याच्या योग्य मार्गावर असल्याचा माझा विश्वास दृढ झाला” असे तो सांगतो.

 

विकी डोनर आणि त्यानंतर डीएलकेएचच्या यशाने मला प्रेक्षकांना थिएटरमध्ये एका वेगळ्या अनुभूतीची आवश्यकता असल्याचे आणि त्यांची आवड बदलत असल्याचे सांगितले. त्यांना चित्रपटांमध्ये वेगळ्या प्रकारे गुंतण्याची इच्छा होती. त्यांना संवाद हवा होता, चर्चा हवी होती आणि घरी विशिष्ट संदेश नेण्याची इच्छा होती.”

आयुष्यमानचे असे मत आहे की डीएलकेएच त्याच्या करियरमधला ऐतिहासिक क्षण होता आणि त्यानंतर त्याने कधीही मागे वळून पाहिले नाही. तो म्हणतो,” हा चित्रपट मला देण्यासाठी मी आदि सर, मनीष शर्मा आणि शरत कटारिया यांचा नेहमी ऋणी आहे. डीएलकेएचने मला आधी कधीही न चोखाळलेला रस्ता निवडणारा आणि शैली व विषयांमध्ये नेहमी प्रयोग करणारा कलाकार म्हणून घडवले.”

 

तो पुढे सांगतो की, ”असे चित्रपट माझ्या विश्वास आणि संवेदनशीलतेचा आवाज आहेत आणि त्यामुळे मला इंडस्ट्रीमध्ये माझे स्वत:चे नशीब स्वत: लिहिण्याची संधी मिळाली. डीएलकेएच नंतर मी कधीही मागे वळून पाहिले नाही,त्यामुळे हा चित्रपट माझ्या करियरसाठी, तसेच माझ्या जीवनासाठी अगदी सूपर स्पेशल आहे.”

टॅग्स :आयुषमान खुराणा