Join us  

"मी दुःख सहन केले, माझ्या मुलांनी...", अरूणा ईराणींनी कधीच आई न होण्याच्या निर्णयावर सोडलं मौन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2024 3:51 PM

Aruna Irani : अरूणा ईराणी यांचे सिने करिअरसोबत खासगी आयुष्यदेखील चर्चेत राहिले आहे.

बेटा, फर्ज, रॉकी, बॉबी आणि लव्ह स्टोरी सह अनेक सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाने रसिकांना भुरळ पाडणारी अभिनेत्री अरूणा ईराणी यांनी हिंदी सिनेसृष्टीत गेल्या सहा दशकापासून जास्त सक्रीय आहे. ५००हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलेल्या अभिनेत्रीला कारवां चित्रपटातून ओळख मिळाली. अरूणा ईराणी यांचे सिने करिअरसोबत खासगी आयुष्यदेखील चर्चेत राहिले आहे. 

सर्वात जास्त अरूणा ईराणी चर्चेत आल्या त्या कुकू कोहली यांच्यासोबतच्या लग्नामुळे. अभिनेत्रीने बराच काळ लग्न लपवून ठेवले होते. याशिवाय त्यांनी कधीच आई न बनण्याचा निर्णय घेतला होता. एका मुलाखतीत अरूणा ईराणी यांनी जगापासून लग्न लपवणे आणि मुले न होण्याच्या निर्णयावर प्रतिक्रिया दिली होती.  अरूणा ईराणी झूमला दिलेल्या मुलाखतीत म्हणाल्या होत्या की, मी एका विवाहित व्यक्तीसोबत लग्न केले आणि ही गोष्ट कोणाला माहित नव्हती. त्यांच्या पहिल्या पत्नीचा एका वर्षांपूर्वीच कोणत्यातरी आजारामुळे निधन झाले होते. आता मी पहिल्यांदा यावर बोलत आहे. अरूणा पुढे म्हणाली की,'कोहराम' दरम्यान माझी कुकुजींची भेट झाली होती. घर चालवण्यासाठी मी तेव्हा खूप चित्रपट करत होते. पण त्या फारशा चांगल्या भूमिका नव्हत्या. मी मद्रासमध्ये माझ्या चित्रपटांमध्ये खूप व्यस्त होते. त्यावेळी कुकुजींनी मला माझ्या महिनाभराच्या तारखा विचारल्या, मी काही दिवस प्रयत्न करून त्यांना सांगितले की मी चित्रपट करू शकत नाही. कुकुजींना राग आला, त्यांना ही कल्पना आवडली नाही. पण आम्ही काम करत राहिलो.

अरुणा इराणी पुढे म्हणाल्या, 'जेव्हा माझ्याकडे काम नव्हते तेव्हा तारखा दिल्या जात होत्या, तरीही ते मला फोन करायचे आणि मला खूप राग यायचा.' कधी-कधी ते मला दिवसभर बसवायचे आणि मग शॉट घ्यायचे, त्यामुळे आमची भांडणं व्हायची. मी कुकुजींचा तिरस्कार करत होते आणि त्यांनाही त्रास होता. मग काय झाले माहित नाही, ते मवाळ होऊ लागले आणि आमची मैत्री झाली. मग त्यांनी माझ्या तारखा जुळवायला सुरुवात केली आणि शेवटी, प्रेम झाले. 

हा एक कठीण निर्णय होता...त्यानंतर अरुणा इराणी यांनी खुलासा केला की तिने कुकू कोहलींसोबतचे लग्न गुप्त ठेवण्याचा निर्णय का घेतला होता. त्यांनी मुलं न होण्याचा निर्णय का घेतला होता हेही त्ंयांनी सांगितले. ती म्हणाली की, 'मी आमच्या लग्नाबद्दल कोणालाही सांगितले नाही कारण ते विवाहित होते. त्यांच्या पहिल्या लग्नाबद्दल मला माहिती नव्हते ही मूर्ख बातमी कुठून आली हे मला माहीत नाही. त्यांची पत्नी मुलांसह सेटवर येत असे. मला याची माहिती होती. तो एक कठीण निर्णय होता. कसेबसे आमचे लग्न झाले. मूल होण्याचा निर्णय आमच्यासाठी योग्य नव्हता. पण माझ्याशी लग्न करण्यासाठी त्यांनी जगाशी लढा दिला.

१९९० मध्ये लग्न झालेअरुणा इराणी आणि कुकू कोहली यांनी १९९० मध्ये लग्न केले. तेव्हा त्या ४० वर्षांच्या होत्या. दुसऱ्या एका मुलाखतीत अरुणा इराणी यांनी सांगितले होते की, जेव्हा कुकू कोहली यांनी  त्यांच्याशी लग्न केले तेव्हा त्यांनी पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला नव्हता. मात्र नंतर हा वाद परस्पर चर्चेतून सोडवण्यात आला.

मुलं न होण्याच्या निर्णयावर अभिनेत्री म्हणाली..अभिनेत्री म्हणाली की, कोणत्या विवाहित व्यक्तीसोबत लग्न करणं सोपे नसते. मी याच कारणामुळे कधी आई बनले नाही. मी हे दुःख सहन करते आहे. हे मी सहन करू शकते. मी त्रस्त झाले आहे, हे ठीक आहे. पण जर माझे मुल विचारेल की वडील कुठे आहे तर मी त्याला काय उत्तर देणार. तर कुकू कोहली पण फसेल. जर माझ्या मुलाला काही झाले तर मी त्यांना बोलवू शकत नाही. त्यामुळे मुल नको होते. ते दुःख मी माझ्या मुलाला देऊ शकत नाही. 

टॅग्स :अरुणा इराणी