बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) हल्ला प्रकरणात संशयित म्हणून छत्तीसगडमधील दुर्ग येथे अटकेत असलेला आकाश कनोजिया याने आपली व्यथा मांडली आहे. त्याने न्याय देण्याची मागणीही केली आहे. आकाशने रविवारी (२६ जानेवारी) सांगितले की, पोलिसांच्या कारवाईनंतर त्याचे आयुष्य पूर्णपणे बर्बाद झाले आहे. त्याच्याकडे नोकरी नाही आणि कुटुंबाची बदनामी होत आहे.
खरेतर, मुंबई पोलिसांकडून माहिती मिळाल्यानंतर, रेल्वे संरक्षण दलाने (RPF) आकाश कनोजिया (३१) याला मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस-कोलकाता शालीमार ज्ञानेश्वरी एक्स्प्रेसमधून १८ जानेवारी रोजी दुर्ग स्थानकावर ताब्यात घेतले होते. १९ जानेवारी रोजी सकाळी मुंबई पोलिसांनी बांगलादेशी नागरिक शरीफुल इस्लाम शहजाद मोहम्मद रोहिल्ला अमीन फकीर उर्फ विजय दास याला शेजारच्या ठाण्यातून अटक केली, त्यानंतर दुर्ग आरपीएफने आकाश कनोजियाची सुटका केली.
'एका चुकीमुळे माझे आयुष्य उद्ध्वस्त झाले'आकाश कनोजिया म्हणाला की, "माझ्या कुटुंबाला धक्का बसला होता. जेव्हा मीडियाने माझे फोटो दाखवायला सुरुवात केली आणि दावा केला की मी या प्रकरणातील मुख्य संशयित आहे. मुंबई पोलिसांच्या एका चुकीमुळे माझे आयुष्य उद्ध्वस्त झाले. त्यांना हे लक्षात आले नाही की मी या प्रकरणातील मुख्य संशयित आहे. अभिनेत्याच्या इमारतीच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसलेल्या माणसाला मिशी नव्हती."
'मी माझ्या होणाऱ्या पत्नीला भेटणार होतो'आकाशने पुढे सांगितले की, "घटनेनंतर मला पोलिसांकडून फोन आला आणि त्यांनी मला मी कुठे आहे, असे विचारले. मी घरी असल्याचे सांगितल्यावर कॉल डिस्कनेक्ट झाला. मी माझ्या होणाऱ्या पत्नीला भेटण्यासाठी जात होतो, तेव्हा मला दुर्गमध्ये ताब्यात घेण्यात आले आणि नंतर रायपूरला नेण्यात आले. तिथे पोहोचलेल्या मुंबई पोलिसांच्या पथकानेही मला मारहाण केली. तो म्हणाला की, सुटका झाल्यानंतर त्याच्या आईने त्याला घरी येण्यास सांगितले, परंतु त्यानंतर त्याच्या आयुष्यात उलथापालथ झाली. तो म्हणाला, "जेव्हा मी माझ्या मालकाला फोन केला तेव्हा त्यांनी मला कामावर न येण्यास सांगितले. त्यांनी माझे म्हणणे ऐकण्यास नकार दिला. यानंतर माझ्या आजीने मला सांगितले की, मला अटक झाल्याचे समजल्यावर माझ्या होणाऱ्या पत्नीच्या कुटुंबीयांनी लग्नाची चर्चा पुढे नेण्यासाठी नकार दिला आहे."
'मी सैफ अली खानच्या घराबाहेर मागणार नोकरी'आकाश कनोजिया यांने सांगितले की, त्याच्या भावाचा दीर्घ उपचारानंतर मृत्यू झालाय, ज्यामुळे त्याच्या कुटुंबाला विरारमधील घर विकून कफ परेडमधील चाळीत स्थलांतर करावे लागले. तो म्हणाला, "माझ्याविरुद्ध कफ परेडमध्ये दोन आणि गुरुग्राममध्ये एक गुन्हे दाखल आहेत. पण याचा अर्थ असा नाही की मला अशाप्रकारे संशयित म्हणून पकडले जावे आणि नंतर मला सोडून दिले जावे. मी सैफ अली खानच्या इमारतीबाहेर उभे राहून नोकरी मागण्याचा विचार करत आहे कारण त्याच्यासोबत जे काही घडले त्यामुळे मी सर्व काही गमावले आहे."
'मला आरोपीसारखे हजर केले गेले असते'कनोजिया पुढे म्हणाला की, देवाची कृपा आहे की, दुर्ग रेल्वे स्थानकावर त्याला ताब्यात घेतल्यानंतर काही तासांतच शरीफुलला पकडण्यात आले. अन्यथा, कुणास ठाऊक कदाचित मला या खटल्यात आरोपी म्हणून हजर केले गेले असते.