गेल्या काही दिवसांपासून अभिषेक बच्चनची भूमिका असलेल्या I want to Talk सिनेमाची चांगलीच चर्चा आहे. सिनेमाच्या पोस्टरपासून I want to Talk सिनेमाच्या कहाणीबद्दल लोकांना उत्सुकता होती. अभिषेक बच्चनचा आजवरच्या सिनेमांपेक्षा वेगळा लूक सिनेमाच्या पोस्टरमध्ये बघायला मिळाला. अखेर काल नुकतंच I want to Talk सिनेमाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला. हसवता हसवता डोळ्यात पाणी आणणारी सिनेमाची कहाणी तुम्हालाही भावुक करेल.
I want to Talk चा टीझर रिलीज
अभिषेक बच्चनच्या I want to Talk ट्रेलरच्या सुरुवातीला अभिषेक बच्चनच्या गळ्याला पट्टा दिसतो. नंतर त्याची मुलगी त्याला इंग्रजीमधील काही अक्षरं बोलायला सांगते. अभिषेक अडखळत अडखळत ही अक्षरं बोलताना दिसतो. पुढे तो डॉक्टरकडे जाताना दिसतो. ट्रेलरमध्ये पुढे दिसतं अभिषेककडे जगण्यासाठी फार कमी दिवस आहेत. दुसरीकडे त्याचे मुलीसोबत मतभेद दिसून येतात.
अभिषेकला एकीकडे आपले उर्वरीत दिवस आनंदात जगायचे आहेत तर दुसरीकडे त्याला मुलीसोबतचं नातं चांगलं करायचंय. एक बाप आणि माणूस म्हणून अभिषेकची तारेवरची कसरत दिसून येते. अशाप्रकारे हसवता हसवता डोळ्यात पाणी आणणारा I want to Talk चा ट्रेलर हृदयस्पर्शी आहे.
I want to Talk कधी रिलीज होणार?
पिकू, पिंक, ऑक्टोबर, विकी डोनर अशा लोकप्रिय सिनेमांचे दिग्दर्शक शूजीत सरकार यांनी I want to Talk चंं दिग्दर्शन केलंय. शूजीत यांचे आधीचे सर्व सिनेमे लोकप्रिय झाले. त्यामुळे I want to Talk कडूनही प्रेक्षकांना अपेक्षा आहेत. हा सिनेमा २२ नोव्हेंबरला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. विशेष म्हणजे अभिषेक बच्चनसोबत सिनेमात जॉनी लिव्हर यांचीही खास भूमिका असल्याचं दिसतंय