Join us

आता गोविंदाही लिहिणार आत्मचरित्र!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2018 12:48 PM

करण जोहर, ऋषी कपूर, आशा पारेख अशा बॉलिवूडच्या अनेक दिग्गजांची आत्मचरित्रे, चरित्रे आपण वाचलीत. या पुस्तकांतील अनेक खळबळजनक खुलाशांच्या हेडलाईन्सही झाल्यात. येत्या काळात बॉलिवूडच्या अशाच एका दिग्गज अभिनेत्याचे आत्मचरित्र आपल्याला वाचायला मिळणार आहे

करण जोहर, ऋषी कपूर, आशा पारेख अशा बॉलिवूडच्या अनेक दिग्गजांची आत्मचरित्रे, चरित्रे आपण वाचलीत. या पुस्तकांतील अनेक खळबळजनक खुलाशांच्या हेडलाईन्सही झाल्यात. येत्या काळात बॉलिवूडच्या अशाच एका दिग्गज अभिनेत्याचे आत्मचरित्र आपल्याला वाचायला मिळणार आहे. हा अभिनेता कोण तर गोविंदा. होय, गोविंदा आपले आत्मचरित्र लिहिणार आहे. अलीकडे एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत खुद्द गोविंदाने हा खुलासा केला. येत्या काळात मी आत्मचरित्र लिहिण्यास सुरूवात करेल. पण माझे आत्मचरित्र ‘बिकाऊ’ नसेन, असे गोविंदा म्हणाला. ‘काम मिळणे बंद झाले असते तर कदाचित मी कधीच आत्मचरित्र लिहिले असते.(हसत हसत) पण आणखी ३-४ वर्षे तरी मी काहीही लिहिणार नाही. माझे पुस्तक केवळ सणसणाटी निर्माण करण्यासाठी नसेल. मला माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षण आठवतो. माझ्या आत्मचरित्राची सुरूवात माझ्या आईपासून होईल. मला लोक मम्माज् बॉय म्हणायचे. एकदा विरार रेल्वे स्टेशनवर काही मुलांनी माझ्या आईबद्दल काही तरी वाईट म्हटले. यानंतर मी त्या २०-२२ मुलांवर तुटून पडलो होतो. पण त्या २ तासांच्या भांडणात माझी प्रचंड धुलाई झाली. त्यांनी मला प्रचंड मार दिला. पण तरिही मला कुठलीही इजा वा दुखापत झाली नाही, असा एक किस्सा गोविंदाने यावेळी ऐकवला. माझ्या आत्मचरित्राच्या शीर्षकाची सुरूवातही माझ्या आईपासूनचं होईल. जो कुणी माझे आत्मचरित्र वाचेल, तो आपल्या आईसोबत कधीच वाईट वागणार नाही,असा दावाही गोविंदाने केला. लवकरच गोविंदाचा ‘रंगीला राजा’ हा चित्रपट प्रदर्शित होतोय. पहलाज निहलानी यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. येत्या १६ नोव्हेंरला या चित्रपटाची रिलीज डेट निश्चित करण्यात आली असली तरीही सेन्सॉर बोर्डाने अद्यापही ‘रंगीला राजा’ला सर्टिफिकेट दिलेले नाही. त्यामुळे ही रिलीज डेट लांबणीवर पडू शकते,अशी शक्यता आहे.

टॅग्स :गोविंदा