Join us

सैफ अली खानच्या लेकाने पापाराझींपासून लपवला चेहरा, 'या' हॉट अभिनेत्रीसोबत साजरा केला न्यू इयर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 14:13 IST

सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम सध्या तरुणींचा क्रश आहे.

नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे. २०२४ वर्षाला निरोप देत सर्वांनी जल्लोषात २०२५ चं स्वागत केलं. बॉलिवूड सेलिब्रिटींनीही वेगवेगळ्या ठिकाणी न्यू इयर सेलीब्रेशन केलं. सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान आणि श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारीही न्यू इयर व्हॅकेशनवरुन परत येताना दिसले. यावेळी दोघांनी पापाराझींपासून चेहरा लपवला. त्यांचा व्हिडिओ समोर आला आहे.

सोशल मीडियावरइब्राहिम अली खान (Ibrahim Ali Khan) आणि पलक तिवारीचा (Palak Tiwari) वेगवेगळा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. विमानतळावरचा व्हिडिओ आहे. पलकने ब्लॅक टॉप आणि डेनिम जीन्स घातली आहे. तसंच डोळ्यावर गॉगल लावला आहे. तर दुसरीकडे इब्राहिम चेहरा लपवताना दिसत आहे. दोघंही एकाच वेळी विमानतळावर दाखल झाले. मात्र पापाराझींची नजर चुकवून ते एकमेकांपासून दूर झाले. तरी पापाराझींनी दोघांना पकडलंच. दोघं नवीन वर्षाचं स्वागत करुन मुंबईत परत आले आहेत. 

या व्हिडिओवर नेटकऱ्यांनीही कमेंट करत त्यांची खेचली आहे. एकाने लिहिले, 'पटौदी परिवाराच्या सूनेचं स्वागत आहे'. तर दुसऱ्याने लिहिले, 'या दोघांमध्ये नक्कीच काहीतरी शिजतंय'. दोघांनीही अद्याप एकमेकांच्या नात्याची जाहीर कबुली दिलेली नाही. अनेकांना ही जोडी आवडलीही आहे. 

टॅग्स :इब्राहिम अली खानपलक तिवारीरिलेशनशिपसोशल मीडियानववर्षाचे स्वागत