Join us  

इब्राहिम अली खान नशेत? कॅमेऱ्यासमोर कूल दिसणारा सैफचा मुलगा यावेळी बावरला; झाला ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2024 5:08 PM

नेहमी पापाराझींसमोर कॉन्फिडंट दिसणाऱ्या इब्राहिमला यावेळी काय झालं?

अभिनेता सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान (Ibrahim Ali Khan)  लवकरच पदार्पण करणार आहे. इब्राहिम अगदी त्याच्या वडिलांसारखाच दिसतो अशा प्रतिक्रिया त्याला येत असतात. पदार्पणाआधीच इब्राहिम तरुणींच्या गळ्यातील ताईत बनला आहे. त्याचे लूक्स, फिट बॉडी यामुळे त्याने फीमेल चाहत्यांना आतापासूनच प्रभावित केले आहे. नेहमी पापाराझींसमोर कॉन्फिडंट दिसणारा इब्राहिम यावेळी मात्र बावरलेला दिसला. त्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय.

पापाराझींसमोर इब्राहिम अली खान नेहमी एक वेगळाच स्वॅग दाखवत असतो. इतर स्टारकीड्सप्रमाणे तो कधीच कॅमेऱ्यासमोर लाजताना दिसला नाही. कथित गर्लफ्रेंड पलक तिवारीसोबतही तो खुलेआम तिचा हात पकडत तिला कारमध्ये बसवतानाही दिसला आहे. पण नुकत्याच व्हायरल झालेल्या व्हिडिओत इब्राहिम अडखळताना दिसला. एक पार्टी अटेंड करुन तो बाहेर येत असतानाच पापाराझी त्याला कॅमेऱ्यात कैद करतात. तेव्हाच इब्राहिमचा तोल जातो आणि तो पडणारच असतो एवढ्यात स्वत:ला सांभाळतो. 

इब्राहिमचा हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी कमेंट करत तो नशेत असल्याचा अंदाज लावला आहे. काल ओरीही नशेत बाहेर पडतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्याच पार्टीतून इब्राहिमही बाहेर पडला. खरं तर बाहेर आल्यानंतर त्याचा पाय एका गोष्टीला आदळतो म्हणून त्याचा तोल जातो मात्र तरी नेटकऱ्यांना तो नशेत असल्याची शंका वाटत आहे.

इब्राहिम अली खानने करण जोहरच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' सिनेमात असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केले. आता लवकरच तो धर्मा प्रोडक्शनच्याच सिनेमात झळकणार आहे.

टॅग्स :इब्राहिम अली खानसैफ अली खान बॉलिवूडसोशल मीडियाट्रोल