Join us

इब्राहिमने पलक तिवारीला सोडलं? दोन मुलांची आई असलेल्या 'या' अभिनेत्रीसोबत दिसला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 14:58 IST

इब्राहिमने त्या अभिनेत्रीच्या आईचीही घेतली भेट

अभिनेता सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान (Ibrahim Ali Khan) चांगलाच चर्चेत असतो. पापाराझी तर त्याला कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी एक संधी सोडत नाही. स्टारकिड्स मध्ये इब्राहिमचं नाव आघाडीवर आहे. लवकरच तो सिनेमात पदार्पण करणार आहे. याशिवाय तो श्वेता तिवारीची लेक पलक तिवारीसोबतच्या अफेअरच्या चर्चांमुळेही सतत प्रसिद्धीझोतात असतो. हे लव्हबर्ड्स मालदीवलाही जाऊन आले. मात्र काल इब्राहिम पलक नाही तर एका वेगळ्याच अभिनेत्रीसोबत दिसला. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

इब्राहिम अली खानने पलक तिवारीला सोडलं?

इब्राहिम अली खान नुकताच दाक्षिणात्य अभिनेत्री श्रीलीलासोबत (Sreeleela) दिसला. मॅडॉक फिल्म्सच्या ऑफिसमधून दोघंही बाहेर पडले. एरवी पलकसोबत पोज देणारा इब्राहिम श्रीलीलाच्या खांद्यावर हात ठेवून हसत पोज देत होता. ब्लॅक आऊटफिटमध्ये इब्राहिम हँडसम दिसत होता. तर श्रीलीलाने गुलाबी स्ट्रॅपलेस टॉप, डेनिम जॅकेट आणि जीन्स असा लूक केला होता. नंतर त्यांनी एकमेकांना मिठी मारली आणि ते पुढे गेले. यानंतर परत येत इब्राहिम श्रीलीलाच्या आईलाही भेटतो. त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

या व्हिडिओनंतर नेटकऱ्यांनी पलक तिवारीचं नाव घेत चेष्टा केली आहे. 'पलक तिवारीचा पत्ता कट', 'ही तर पलकपेक्षा चांगली आहे', 'दोघं सोबत चांगले दिसत आहेत' अशा कमेंट्स आल्या आहेत.

श्रीलीलाने नुकतंच 'पुष्पा २' मध्ये 'किसीक' हे आयटम साँग केलं ज्याची चर्चा झाली.  श्रीलीलाने एमबीबीएस केलं आहे. वयाच्या २१ व्या वर्षीच तिने २ मुलांना दत्तक घेतलं. लवकरच ती बॉलिवूड डेब्यू करणार आहे. तर दुसरीकडे इब्राहिम 'दिलेर' सिनेमातून पदार्पण करणार आहे. त्याने याआधी करण जोहरच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' सिनेमात सह दिग्दर्शनाचं काम केलं. 

टॅग्स :इब्राहिम अली खानबॉलिवूडसोशल मीडिया