सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान (Ibrahim Ali Khan) त्याच्या पदार्पणाआधीच इतका चर्चेत आहे. त्याच्या गुड लूक्सवर तरुणी फिदा आहेत. सोशल मीडियावर मोस्ट हँडसम स्टारकिड म्हणून त्याची चर्चा असते. तसंच तो सैफ अली खानचं तरुणपणीचं व्हर्जन आहे अशीही चर्चा होते. इब्राहिम त्याच्या बॉलिवूडमधील डेब्यूसाठी सज्ज आहे. माध्यम रिपोर्टनुसार, तो जान्हवी कपूरसोबत (Janhavi Kapoor) आगामी सिनेमात रोमान्स करताना दिसणार आहे. हा त्याच्या दुसरा सिनेमा असणार आहे.
हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार, इब्राहिम आणि जान्हवीने नुकतीच एक रोमँटिक कॉमेडी फिल्म साईन केली आहे. या सिनेमात आणखी एक अभिनेत्री महिमा मकवानाही असणार आहे. त्यामुळे इब्राहिम एक नाही तर दोन अभिनेत्रींसोबत झळकणार आहे. लवकरच सिनेमाच्या प्री प्रोडक्शनला सुरुवात होणार आहे आणि पुढील वर्षी शूटिंग सुरु होणार आहे. सिनेमाचं नाव अद्याप निश्चित झालेलं नाही. शशांक खेतान सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत. सध्या केवळ कच्ची स्क्रीप्ट तयार आहे. मात्र कास्टिंग आता फायनल झाली असून या तिघांमध्ये लव्हट्रँगल असणार आहे.
विशेष म्हणजे इब्राहिमचा डेब्यू सिनेमा 'सरजमीन' असणार आहे. धर्मा प्रोडक्शनच्या या सिनेमात काजोलसोबत त्याने स्क्रीन शेअर केली आहे. इब्राहिम खानने गेल्या वर्षी रिलीज झालेल्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' सिनेमासाठी असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केले होते. करण जोहरला असिस्ट करण्याची संधी त्याला यातून मिळाली होती. इब्राहिमची बहीण सारा अली खान तर सध्या बॉलिवूडमध्ये आघाडीची अभिनेत्री आहेच. इब्राहिमनेही त्याच्या हँडसम लूकने चाहत्यांचं मन जिंकलंच आहे मात्र आता त्याच्या अभिनयाची परीक्षा असणार आहे. यात तो किती खरा उतरतो हे पाहणं महत्वाचं असणार आहे.