Join us

...तर कंगनाने केले असते ‘या’ चित्रपटात काम!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 01, 2017 6:14 PM

राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री कंगना राणौत हिने २००६ यावर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. एवढी गुणी अभिनेत्री बॉलिवूडला कुठल्या चित्रपटाच्या माध्यमातून ...

राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री कंगना राणौत हिने २००६ यावर्षी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. एवढी गुणी अभिनेत्री बॉलिवूडला कुठल्या चित्रपटाच्या माध्यमातून प्राप्त झाली? असा प्रश्न तुमच्या मनात येणे यात काही नवल नाही. पण, तुम्हाला हे माहितीये का ‘गँगस्टर’ या चित्रपटातून तिने बॉलिवूड डेब्यू केला होता. जर तिला या चित्रपटाची आॅफर मिळाली नसती तर तिचे करिअर अडचणीत आले असते. कारण त्याचवेळी तिला एका अ‍ॅडल्ट चित्रपटाची आॅफर आलेली होती म्हणे. एका टीव्ही शोवर बोलताना कंगना म्हणते, ‘मी बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी माझ्या हातात कुठलाही चित्रपट नव्हता. ‘गँगस्टर’ आणि एका अ‍ॅडल्ट चित्रपटाची आॅफर मला एकाचवेळी मिळाली. मी गँगस्टरची आॅफर स्वीकारली म्हणून आज मी या उंचीवर आहे. कारण, तो प्रौढ चित्रपट बॉलिवूडमधील एन्ट्रीसाठी योग्य नव्हता. त्यानंतर मी एक फोटोशूट केला. त्यावेळी त्यांनी मला एक ‘रोब’ दिला. त्या रोबमध्ये काहीही नव्हते. या फोटोशूटसाठी काम करणे म्हणजे एखाद्या ब्ल्यू फिल्ममध्ये काम केल्यासारखं वाटत होतं. ते चांगलंही दिसत नव्हतं. कारण तो चांगला चित्रपट नव्हताच.’ पुढे कंगना म्हणते,‘मग मी तो शूट केला नाही. दरम्यान मला ‘गँगस्टर’ मिळाला. त्याचबरोबर मला वाटलं की, होय, हाच तो चित्रपट ज्याची मी वाट पाहत होते. बॉलिवूडमध्ये एन्ट्री केल्यानंतर मात्र मग मी कुठल्याही चित्रपटाला नाही म्हणाले नाही.’ कंगना राणौत ही सध्या ‘रंगून’ चित्रपटासाठी चर्चेत आहे. सैफ अली खान, शाहिद कपूर यांच्यासोबत ती प्रथमच काम करत असून सध्या चित्रपटाचे पोस्ट प्रॉडक्शनचे काम सुरू आहे. चित्रपटाचे संगीत हे ‘ओपेरा-लाईक’ असल्याचे नुकतेच गायक सुखविंदर सिंग यांनी सांगितले. पोस्टर्स, टीझर, ट्रेलर आता लवकरच लाँच करण्यात येतील असे सूत्रांकडून कळतेय.