Join us  

अक्षय कुमार नाही तर हा असणार 'स्त्री ३' मध्ये खलनायक? 'जना'चा मोठा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2024 10:02 AM

'स्त्री २' सध्या सुपरहिट झाला असून सध्या आगामी 'स्त्री ३'ची चर्चाही सुरु झालीय. काय असणार कहाणी, कोण असणार खलनायक वाचा एका क्लिकवर

 सध्या 'स्त्री २' सिनेमाची चांगलीच चर्चा आहे. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली असून सर्वांना हा सिनेमा आवडतोय. श्रद्धा कपूर, राजकुमार राव, अपारशक्ती खुराना यांची प्रमुख भूमिका असलेला हा सिनेमा हसवता हसवता प्रेक्षकांची घाबरगुंडी करतोय. 'स्त्री २' मध्ये असलेल्या सरकटे या खलनायकाने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली. 'स्त्री २'नंतर आता 'स्त्री ३' ची चर्चा सुरु झालीय. 'स्त्री ३'ची कहाणी आणि सिनेमात खलनायक कोण साकारणार, याविषयी 'स्त्री'मधील 'जना' अर्थात अभिषेक बॅनर्जीने खुलासा केलाय. 

काय असणार स्त्री ३ ची कहाणी

एका मुलाखतीत अभिषेक बॅनर्जीने एक इंटरेस्टिंग खुलासा केला. जना 'स्त्री ३'मध्ये खलनायक साकारेल का? असा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा अभिषेक म्हणाला, "ही आयडीया चांगली आहे. आमचे दिग्दर्शक अमर कौशिकने ही कल्पना ऐकायला पाहिजे. मी स्त्री ३ मध्ये सुपरविलन असू शकतो. स्त्री ३ मध्ये जनाला सुपरविलन बघायला नक्कीच मजा येईल. जना आता स्त्री युनिव्हर्समधील संजय झालाय. सरकटा असो की स्त्री.. कोणतंही भूत जनाला येऊन पछाडतं. त्यामुळे आता बघूया स्त्री ३ मध्ये मेकर्स जनाला कोणत्या रुपात समोर आणतात."

स्त्री ३ मध्ये अक्षय कुमार असणार

ज्यांनी 'स्त्री २' पाहिलाय त्यांना कल्पना आली असेल की, अक्षय कुमार सिनेमाच्या शेवटी लाव्हा पिऊन ताकदवान होतो. त्यामुळे हॉरर सिनेमांच्या पुढच्या युनिव्हर्समध्ये अक्षय कुमार भयंकर खलनायक म्हणून समोर येईल, अशी शक्यता नाकारता येत नाही. याशिवाय अभिषेकने खुलासा केलाय त्यानुसार जर 'स्त्री ३'मध्ये जना सुपरविलन म्हणून आला तर, अक्षय-जना या दोघांना एकत्र खलनायकाच्या भूमिकेत बघायला मजा येणार हे नक्की.

 

टॅग्स :राजकुमार रावश्रद्धा कपूरबॉलिवूडअपारशक्ती खुराना