Join us

बॉलिवूडमध्ये काम करू इच्छित असाल तर प्रियंका चोपडा करणार तुमची मदत!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2018 9:48 AM

पर्पल पेबल पिक्चर्स या आपल्या प्रॉडक्शन हाउसअंतर्गत प्रादेशिक चित्रपटांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करणारी अभिनेत्री तथा निर्माती प्रियंका चोपडा आता ...

पर्पल पेबल पिक्चर्स या आपल्या प्रॉडक्शन हाउसअंतर्गत प्रादेशिक चित्रपटांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करणारी अभिनेत्री तथा निर्माती प्रियंका चोपडा आता बॉलिवूडमध्ये करिअर करू इच्छिणाºया नवकलाकारांना मदत करणार आहे. प्रियंकाने गेल्या गुरुवारी आपल्या बॅनरअंतर्गत एक अधिकृत वेबसाइट लॉन्च केली आहे. तिने यामध्ये एक टॅलेंट प्लेटफॉर्म मंच स्थापन केला आहे. या मंचच्या माध्यमातून अभिनय, पटकथा लेखन, सिनेमेट्रोग्राफी, संपादन आणि चित्रपटाचे दिग्दर्शन करू इच्छिणाºयांना संधी दिली जाईल. प्रियंकाची आई आणि पर्पल पेबल पिक्चर्सच्या सहव्यवस्थापक मधु चोपडा यांनी एका वक्तव्यात म्हटले की, ज्यांच्याकडे चित्रपट क्षेत्राशी संबंधित कौशल्य आहे, त्यांनी आमच्याकडे अर्ज सादर करावा. पुढे बोलताना मधु चोपडा यांनी सांगितले की, ‘आमच्या आगामी प्रोजेक्टसाठी तुम्ही उपयुक्त असल्याचे आमच्या लक्षात येताच आम्ही तुमच्याशी संपर्क साधणार आहोत. हे सर्व करण्यामागचा आमचा एकच उद्देश आहे, तो म्हणजे प्रतिभासंपन्न लोकांना पुढे जाण्याची संधी उलपब्ध करून देणे. कारण आज बरेचसे प्रतिभावंत  केवळ संधीअभावी त्यांच्यातील कौशल्य दाखवू शकत नाही. खरं तर आपल्याकडे प्रतिभासंपन्न लोकांची कमी नाही, पात्र संधी कमी असल्याने हे लोक कधीच समोर येत नाहीत. मधु यांनी त्यांची मुलगी आणि माजी विश्वसुंदरी प्रियंकाविषयी सांगताना म्हटले की, सुरुवातीच्या दिवसांमध्ये बॉलिवूडमध्ये काम करताना प्रियंकाकडे अशी एकही व्यक्ती नव्हती जिच्याकडून सल्ला घेऊन ती पुढे जाऊ शकेल. या वेबसाइटच्या माध्यमातून मनोरंजन उद्योगात येऊ इच्छिणाºयांना प्रोत्साहन देण्याचे काम स्वत: प्रियंका करणार आहे. याबाबतची इतर माहिती लवकरच उपलब्ध करून दिली जाईल.