Join us

NCB ला करण जोहरनंतर रणबीर, अर्जुन रामपालला अडकवायचंय - क्षितिज प्रसाद

By अमित इंगोले | Published: October 05, 2020 12:21 PM

एनसीबी त्यांच्या मनातील गोष्टी त्याच्या तोंडून वदवून घेण्यासाठी त्याला टॉर्चर करत आहे. आता एनसीबीने यावर स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांनी उलट क्षितिजवर आरोप लावलाय की, तो चौकशी सहकार्य करत नाहीये. 

धर्मा प्रॉडक्शनचा माजी एक्झिक्यूटीव्ह प्रोड्यूसर क्षितिज प्रसाद गेल्या काही दिवसांपासून ड्रग केसमुळे चर्चेत आलाय. ड्रग्स केसचा तपास करत असलेल्या एनसीबीवरच क्षितिजने आरोप लावले आहेत. त्याच्यानुसार,  एनसीबी त्यांच्या मनातील गोष्टी त्याच्या तोंडून वदवून घेण्यासाठी त्याला टॉर्चर करत आहे. आता एनसीबीने यावर स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांनी उलट क्षितिजवर आरोप लावलाय की, तो चौकशी सहकार्य करत नाहीये. 

thehindu.com ने दिलेल्या वृत्तानुसार, क्षितिजने त्याच्या जबाबात सांगितले की, रणबीर कपूर, अर्जुन रामपाल आणि डीनो मारिया यांच्या विरोधात खोटी साक्ष देऊन फसवण्यासाठी एसबीसी माझ्यावर जबरदस्ती करत आहे. मी अनेकदा सांगितलं आहे की, मी यातील कुणालाही पसर्नली ओळखत नाही. क्षितिज म्हणाला की, चुकीचा जबाब नोंदवण्यासाठी जबरदस्ती करण्यात आली. दरम्यान याआधी प्रसादने एनसीबीवर आरोप केला होता की, ते करण जोहर विरोधात खोटा जबाब नोंदवण्यासाठी फोर्स करत आहे. अशात क्षितिजला ६ ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. (डायरेक्ट दिल से...! अक्षय कुमार बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शनबद्दल बोलला, वाचा काय म्हणाला... )

तेच दुसरीकडे याबाबत एनसीबीने सांगितले की, प्रसादकडून लावण्यात आलेले आरोप खोटे आहेत. तो चौकशीत योग्य प्रकारे सहकार्य करत नाहीये. तो त्यानेच दिलेल्या जबाबावर स्वाक्षरी करण्यास नकार देत आहे. इतकेच काय तर स्वाक्षरी करण्यासाठी क्षितिज सौदेबाजी करत आहे. (NCB चे उपसंचालक केपीएस मल्होत्रा कोरोना पॉझिटिव्ह; दीपिकाची केली होती चौकशी)

दरम्यान, स्पेशल पब्लिक प्रॉसिक्यूटर अतुल सारपंदे यांनी एनसीबी द्वारे रेकॉर्ड करण्यात आलेलं स्टेटमेंट सादर केलं आणि म्हणाले की,  ज्या नावांचा उल्लेख प्रसाद करत आहे ती नावे या स्टेटमेंटमध्ये नाहीच. आता दोघांपैकी कोण खरं बोलतंय हे तर येणाऱ्या काही दिवसात समजेलच. 

टॅग्स :नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोअमली पदार्थबॉलिवूडरणबीर कपूरअर्जुन रामपाल