आयफा अॅवार्डसाठी सध्या कॅटरिना कैफ न्यूयॉर्कमध्ये आहे. आयफा पुरस्कार सोहळ्यात सध्या सगळ्यात जास्त चर्चा ही कॅटरिना आणि सलमान खानचीच आहे. कॅटरिना आणि सलमानची खूप छान केमिस्ट्री तिथे पाहायला मिळत आहे. या पुरस्कार सोहळ्याच्या पत्रकार परिषदेत सलमान आणि कॅटरिना सतत एकत्र होते. एवढेच नव्हे तर सलमान कॅटरिनाची टर देखील उडवत होता. तसेच या पुरस्कार सोहळ्यामुळे कॅटरिनाच्या नव्या मैत्रिणी विषयी सगळ्यांना कळले आहे. कॅटरिना आणि आलिया भट्ट यांची खूप चांगली मैत्री या पुरस्कार सोहळ्याच्या पत्रकार परिषदेच्या दरम्यान सगळ्यांना दिसून येत आहे. पण त्याचसोबत आणखी एक गोष्ट या पुरस्कार सोहळ्याच्या दरम्यान सगळ्यांच्या लक्षात आली आहे. ही गोष्ट कॅटरिनाशी संबंधित आहे. कॅटरिनाची ही गोष्ट कळल्यानंतर तुम्हाला तुमचे हसू नक्कीच आवरणार नाही...
कॅटरिना कैफ ही हॉटेलच्या लिफ्टमधून जात असताना तिच्या लिफ्टमध्ये कोणीही असलेले तिला आवडत नाही. त्यामुळे ती लिफ्टने जात असताना लिफ्टमधील इतर लोकांना बाहेर यावे लागते. कॅटरिनाचे हे वागणे नक्कीच विचित्र आहे. पण लिफ्टमध्ये इतर लोकांची तिला भीती वाटते की तिला लिफ्टने एकटीनेच जायला आवडले हे त्यामागील एक कारण असू शकते. पण या मागील खरे कारण काय आहे हे केवळ तीच सांगू शकते.
तर दुसरीकडे बॉलिवूडमधले इतर कलाकार लोकांमध्ये खूप चांगल्या प्रकारे मिसळत आहेत. तसेच लोकांसोबत फोटो काढत आहेत, त्यांना ऑटोग्राफ देत आहेत. भारताप्रमाणेच न्यूयॉर्कमध्ये देखील बॉलिवूडच्या कलाकारांना मोठे फॅन फॉलॉव्हिंग आहे. त्यांची एक झलक पाहाण्यासाठी लोक प्रचंड गर्दी करत आहेत. Also Read : IIFA 2017 : Exclusive न्यूयॉर्कमध्ये फुलतोय सलमान खान आणि कतरिना कैफचा रोमान्स