सध्या अबूधाबीमध्ये IIFA Awards 2024 ची रेलचेल सुरु आहे. या पुरस्कार सोहळ्यासाठी बॉलिवूडमधील तारेतारका उपस्थित राहिले आहेत. IIFA Awards 2024 ची चांगलीच क्रेझ पाहायला मिळाली. या पुरस्कार सोहळ्यात कोणाला कोणते पुरस्कार मिळाले, याची विजेत्यांची यादी समोर आलीय. यामध्ये 'जवान' सिनेमासाठी शाहरुख खानला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. ए.आर.रहमान आणि मणीरत्नम यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारताना मणी रत्नम यांना नमस्कार करत शाहरुखने हा पुरस्कार स्वीकारला. पाहा IIFA Awards 2024 कोणाला कोणते पुरस्कार मिळाले.
IIFA Awards 2024 विजेत्यांची संपूर्ण यादी
- बेस्ट फिल्म- अॅनिमल
- बेस्ट सपोर्टिंग अॅक्टर- अनिल कपूर (अॅनिमल)
- बेस्ट सपोर्टिंग अॅक्ट्रेस- शबाना आजमी (रॉकी और रानी की प्रेम कहानी)
- बेस्ट अॅक्टर- शाहरुख खान (जवान)
- बेस्ट अॅक्ट्रेस- राणी मुखर्जी (मिसेज चॅटर्जी वर्सेस नॉर्वे)
- बेस्ट एक्टर इन नेगेटिव रोल- बॉबी देओल (अॅनिमल)
- आउटस्टैंडिंग कॉन्ट्रीब्यूशन टू इंडियन सिनेमा- जयंतीलाल गड़ा, हेमा मालिनी
- अचीवमेंट ऑन कंप्लीटिंग 25 ईयर्स इन सिनेमा- करण जोहर
- बेस्ट म्यूझिक- अॅनिमल
- बेस्ट लिरिक्स- सिद्धार्थ-गरिमा (अॅनिमल सॉन्ग सतरंगा)
- बेस्ट सिंगर मेल- भूपिंदर बब्बल (अॅनिमल सॉन्ग अर्जन वेली)
- बेस्ट डायरेक्टर- विधु विनोद चोपड़ा (12th फेल)
- बेस्ट स्टोरी- रॉकी और रानी की प्रेम कहानी
- बेस्ट स्टोरी (एडेप्टेड)- 12th फेल
- बेस्ट सिंगर फीमेल- शिल्पा राव (जवान सॉन्ग चलेया)
अशाप्रकारे IIFA 2024 पुरस्कार सोहळ्यात विजेत्यांना गौरवण्यात आले. IIFA 2024 या वर्षी अबू धाबीला संपन्न झाला. या सोहळ्याचं विशेष आकर्षण ठरला तो म्हणजे शाहरुख खान. शाहरुख खानने त्याच्या खास अंदाजात IIFA 2024 चं होस्टिंग केलेलं दिसलं. शाहरुखला करण जोहर आणि विकी कौशलची साथ मिळाली. या सोहळ्यासाठी ज्येष्ठ अभिनेत्री रेखा यांनीही विशेष परफॉर्मन्स केलेला दिसला.