ठळक मुद्देकधी काळी सलमान व कॅटच्या रिअल लाईफ रोमान्सच्या बातम्या चर्चेत होत्या.
आयफा अवॉर्डचा रंगारंग सोहळा अनेक कारणांनी गाजला. आयफा अवार्डच्या ग्रीन कार्पेटवर ग्लॅमरस अवतारात दिसलेले बॉलिवूड सेलिब्रिटी, त्यांचे एकापेक्षा एक ग्लॅमरस लूक्स, धम्माल परफॉर्मन्स आणि बरेच काही. यंदा हा सोहळा मुंबईत पार पडला. तूर्तास या सोहळ्यातील एक व्हिडीओ वा-याच्या वेगाने व्हायरल होतोय. होय, हा व्हिडीओ आहे भाईजान सलमान खानचा. यात सलमान प्रेक्षकांमध्ये बसलेला दिसतोय. अचानक स्टेजवर कतरीना कैफच्या परफॉर्मन्सची घोषणा होते आणि सलमान खान अगदी क्रेजी होतो. इतका की, कतरीनाचे नाव ऐकताच तो उभा होतो आणि जोरात टाळ्या वाजवू लागतो.
कतरीनासाठी इतका क्रेजी झालेला भाईजान पाहून चाहतेही क्रेजी झालेत. त्यांनी या व्हिडीओवर मजेशीर कमेंट्स दिल्यात. ‘तुम्ही दोघे लग्न का करत नाहीत?’ असे हा व्हिडीओ पाहून एका युजरने लिहिले. तर अनेकांनी सलमान अद्यापही कतरीनावर फिदा आहे, अशा आशयाच्या प्रतिक्रिया दिल्यात.सलमान व कटरिनाची रिल लाईफ केमिस्ट्रीपेक्षा रिअल लाईफ केमिस्ट्री दमदार आहे. एकदा सलमानसोबतच्या नात्याबद्दल बोलताना खुद्द कतरीनाने आमच्यात एक खास नाते आहे. पण या नात्याला नाव देता येणार नाही, असे म्हटले होते.
कधी काळी सलमान व कॅटच्या रिअल लाईफ रोमान्सच्या बातम्या चर्चेत होत्या. पण अचानक या दोघांत रणबीर कपूरची एन्ट्री झाली आणि भाईजान व कॅटचे ब्रेकअप झाले. पुढे अगदी चित्रपटांत शोभावे तसे कॅट व रणबीरचेही ब्रेकअप झाले आणि कॅट पुन्हा भाईजानच्या जवळ आली. कदाचित म्हणूनच प्रसंग कुठलाही असो, भाईजान कॅटच्या मदतीला तत्पर असतो. तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा असतो.