IIFA Awards 2017 : ‘उडता पंजाब’साठी शाहिद कपूर , आलिया भट्ट ठरले बेस्ट; ‘नीरजा’ सर्वोत्कृष्ट चित्रपट
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2017 6:25 AM
आयफा अवार्ड २०१७ च्या रंगारंग पुरस्कार सोहळ्यात अभिनेता शाहिद कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट या दोघांनी अनुक्रमे सर्वोत्कृष्ट सर्वोत्कृष्ट ...
आयफा अवार्ड २०१७ च्या रंगारंग पुरस्कार सोहळ्यात अभिनेता शाहिद कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट या दोघांनी अनुक्रमे सर्वोत्कृष्ट सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या पुरस्कारावर नाव कोरले. ‘उडता पंजाब’साठी शाहिदला बेस्ट अॅक्टरच्या आयफा ट्रॉफीने गौरविण्यात आले. आलियाला याच चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.‘पिंक’चे दिग्दर्शक अनिरूद्ध रॉय चौधरी यांना बेस्ट डायरेक्टरची आयफा ट्रॉफी मिळाली. सोनम कपूरच्या ‘नीरजा’ने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार आपल्या नावावर केला. या रंगीबेरंगी कार्यक्रमाच्या सुरुवात झाली ती होस्ट सैफ अली खान आणि करण जोहरच्या कोपरखळ्यांनी. करण व सैफच्या एन्ट्रीने सुरु झालेल्या या सोहळ्यात पहिला-वहिला परफॉर्मन्स करण्यासाठी उतरली ती, चुलबुली आलिया भट्ट. आलियाने आपल्या परफॉर्मन्सने सोहळ्याला अशी काही रंगत आणली की,समोर बसलेले सगळे बॉलिवूडपे्रमी अक्षरश: नाचायला लागले.आयफा अवार्ड सोहळ्यात करण जोहर दिग्दर्शित ‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटाने सर्वाधिक पुरस्कार जिंकले. बेस्ट म्युझिक डायरेक्टर, बेस्ट लिरिक्स, बेस्ट प्लेबॅक सिंगर असे सगळे पुरस्कार या चित्रपटाच्या झोळीत पडले. या चित्रपटासाठी प्रीतमला सर्वोत्कृष्ट म्युझिक डायरेक्टरचा पुरस्कार दिला गेला. अमिताभ भटचार्यला ‘चन्ना मेरेया’ या गाण्यासाठी बेस्ट लिरिक्स आणि अमित मिश्रा यास ‘बुलेया’ या गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकाचा पुरस्कार देण्यात आला. आयफा अवार्ड सोहळ्यात तापसी पन्नूला ‘वूमन आॅफ द इयर’च्या पुरस्काराने गौरविण्यात आले. अभिनेता वरूण धवन याला ‘ढिशूम’मधील भूमिकेसाठी बेस्ट कॉमिक अॅक्टरच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. बेस्ट फिमेल डेब्यूसाठी दिलेल्या पुरस्कारावर नाव कोरले ते दिशा पटनी हिने. ‘एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी’तील भूमिकेसाठी तिला हा पुरस्कार देण्यात आला. यालऊट बेस्ट डेब्यू मेल हा पुरस्कार दिलजीत दोसांज (उडता पंजाब) याने पटकावला. बेस्ट परफॉर्मन्स इन निगेटीव्ह रोलसाठीचा पुरस्कार जिम सरभ (नीरजा)याला देण्यात आला. आलिया भट्ट हिला खास स्टाईल आयकॉन पुरस्काराने गौरविण्यात आले. बॉलिवूडमध्ये २५ वर्षे पूर्ण केल्याबद्दल संगीतकार ए.आर. रहमान यांना आयफा पुरस्काराने गौरविण्यात आले. बेस्ट सपोर्टींग अॅक्टरचा पुरस्कार ‘एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी’साठी अनुपम खेर यांना देण्यात आला. नीरजा’तील भूमिकेसाठी शबाना आझमी यांना बेस्ट सर्पोटींग अॅक्ट्रेसच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. ‘कपूर अॅण्ड सन्स’साठी शुकन बत्रा व आयशा देवित्रे ढिल्लो यांना बेस्ट स्टोरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.बेस्ट प्लेबॅक सिंगर मेल- अमित मिश्रा (बुलेया, ऐ दिल है मुश्किल)बेस्ट प्लेबॅक सिंगर फीमेल- कनिका कपूर (उड़ता पंजाब) व तुलसी कुमार (एयरलिफ्ट)बेस्ट म्यूजिक डायरेक्टर- प्रीतम (ऐ दिल है मुश्किल)बेस्ट कॉमिक अॅक्टर- वरुण धवन (ढिशूम)बेस्ट परफॉर्मेंस इन नेगेटिव रोल- जिम सरभ (नीरजा)बेस्ट लीरिक्स- अमिताभ भट्टाचार्य (चन्ना मेरेया, ऐ दिल है मुश्किल)बेस्ट फीमेल डेब्यू- दिशा पाटनी (एमएस धोनी)बेस्ट डेब्यू मेल- दिलजीत दोसांज (उड़ता पंजाब)