Join us

Iifa Awards 2019: आलिया भट सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, रणवीर सिंग सर्वोत्कृष्ट अभिनेता

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2019 11:03 AM

आयफा पुरस्कार सोहळा बॉलिवूडसाठी कुठल्या सणापेक्षा कमी नसतो. बॉलिवूड कलाकारांच्या ग्लॅमरने सजलेला हा सोहळा नेहमीच खास असतो. यंदाही हा सोहळा लक्षवेधी ठरला.

ठळक मुद्देईशान खट्टर (धडक) आणि सारा अली खान (केदारनाथ)यांना सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा पुरस्कार देण्यात आला.

इंटरनॅशनल इंडियन फिल्म अ‍ॅकेडमी अर्थात आयफा पुरस्कार सोहळा बॉलिवूडसाठी कुठल्या सणापेक्षा कमी नसतो. बॉलिवूड कलाकारांच्या ग्लॅमरने सजलेला हा सोहळा नेहमीच खास असतो. यंदाही हा सोहळा लक्षवेधी ठरला.यंदा आयफा सोहळ्याला 20 वर्षे पूर्ण झालीत. विशेष म्हणजे, यंदा पहिल्यांदा मुंबईत हा सोहळा आयोजित केला गेला. काल रंगलेल्या या रंगारंग सोहळ्यात बॉलिवूडच्या अनेक कलाकारांना आयफा अवार्ड 2019 या पुरस्काराने गौरविण्यात आले.

आलिया भटच्या अभिनयाने सजलेल्या ‘राजी’ या चित्रपटाला या सोहळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले. या चित्रपटासाठी आलिया भट हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.  अभिनेता रणवीर सिंगला ‘पद्मावत’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ज्येष्ठ अभिनेते आणि विनोदवीर जगदीप जाफरी यांना यावेळी  जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. ‘अंधाधुन’ या चित्रपटाचे दिग्दर्शक श्रीराम राघवन यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार देण्यात आला.

 

‘पद्मावत’ या चित्रपटासाठी अभिनेत्री अदिती राव हैदरी हिला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्काराने गौरविले गेले. तर अभिनेता विकी कौशल याला ‘संजू’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

 

ईशान खट्टर (धडक) आणि सारा अली खान (केदारनाथ)यांना सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा पुरस्कार देण्यात आला.

पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी

सर्वोत्कृष्ट चित्रपट- राजी

सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- आलिया भट (राझी)

सर्वोत्कष्ट अभिनेता- रणवीर सिंग (पद्मावत)

सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- श्रीराम राघवन (अंधाधुन)

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री- अदिती राव हैदरी (पद्मावत)

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता- विकी कौशल (संजू)

सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेत्री -सारा अली खान (केदारनाथ)

सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेता- ईशान खट्टर

(आयफा पुरस्काराच्या) २०व्या वषार्तील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- दीपिका पादुकोण

(आयफा पुरस्काराच्या) २०व्या वषार्तील सर्वोत्कृष्ट अभिनेता- रणबीर कपूर

गेल्या २० वर्षांमधील सर्वोत्कृष्ट संगीत- प्रितम

गेल्या २० वर्षांतील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक- राजकुमार हिरानी (संजू)

सर्वोत्कृष्ट संगीत-  सोनू के टिटू की स्वीटी 

सर्वोत्कृष्ट कथा-  अंधाधुन 

जीवनगौरव पुरस्कार - ज्येष्ठ अभिनेते आणि विनोदवीर जगदीप जाफरी

सर्वोत्कृष्ट गीतकार- अमिताभ भट्टाचार्य (धडक)

सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक- अरिजित सिंग (ए वतन- राजी)

सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका- हर्षदीप कौर (दीलबरो- राजी)

टॅग्स :आयफा अॅवॉर्डआलिया भटरणवीर सिंगसारा अली खानइशान खट्टर