IIFA 2025: ९० च्या दशकातील असे अनेक चित्रपट आहेत ज्यांचा चाहतावर्ग अजूनही कायम आहे. त्या काळातील चित्रपटांचं कथानक, गाणी शिवाय काही कलाकारांच्या जोडीला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं. शाहरुख आणि माधुरी दीक्षित यांची जोडीला रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी चाहते कायम उत्सुक असतात. अशातच IIFA च्या निमित्ताने 'दिल तो पागल है' या चित्रपटानंतर शाहरुख आणि माधुरी पुन्हा एकदा एकत्र स्टेज परफॉर्मन्स करताना दिसले. IIFA 2025 पुरस्कार सोहळ्यातील त्यांचा एक डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे.
सोशल मीडियावर च्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. 'आयफा पुरस्कार २०२५' सोहळ्यात अभिनेता शाहरुख खान आणि माधुरी दिक्षितने 'दिल तो पागल है' मधील गाण्यांवर जबरदस्त डान्स केला आहे. शाहरुख-माधुरीच्या डान्सचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
जयपुरमध्ये काल रविवारी ९ मार्चला 'आयफा पुरस्कार २०२५' पार पडला. हिंदी सिनेसृष्टीतील बरेच कलाकार मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित राहिले होते. दरम्यान, या पुरस्कार सोहळ्यात बॉलिवूड सेलिब्रिटींचे खास परफॉर्मन्स देखील पाहायला मिळाले. IIFA २०२५ मधील सुपरस्टार शाहरुख खान आणि माधुरी दीक्षित यांचा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्यांची अप्रतिम केमिस्ट्री पाहून चाहते कौतुक करताना दिसत आहेत.
दरम्यान, 'आयफा पुरस्कार २०२५'मध्ये 'लापता लेडीज' ला सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार मिळाला आहे. याशिवाय अभिनेत्री सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार नितांशी गोयल (लापता लेडीज) आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कारावर कार्तिक आर्यनने (भुल भूलैया ३) नाव कोरलं आहे.