काल आयफा पुरस्कार २०२५ सोहळा (iifa awards 2025) रविवारी जयपूरमध्ये पार पडला. या सोहळ्यासाठी बॉलिवूडमधील सर्व कलाकारांनी खास हजेरी लावली होती. शनिवारी आयफा डिजीटल पुरस्कार पार पडले. तर रविवारी २०२४ मध्ये रिलीज झालेल्या बॉलिवूडमधील उत्कृष्ट कलाकृतींना सन्मानित करण्यात आलं. आयफा पुरस्कार सोहळ्यासाठी कोणाला कोणते पुरस्कार मिळाले, जाणून घ्या सविस्तर
- बेस्ट पिक्चर: लापता लेडीज
- सर्वोत्कृष्ट अभिनेता -कार्तिक आर्यन (भूल भूलैय्या ३)
- सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- नीतांशी गोएल (लापता लेडीज)
- बेस्ट डायरेक्शन-किरण राव (लापता लेडीज)
- बेस्ट परफॉर्मन्स निगेटिव्ह- राघव जुएल (किल)
- सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेत्री- जानकी बोडीवाला (शैतान)
- सर्वोत्कृष्ट साहाय्यक अभिनेता- रवी किशन (लापता लेडीज)
- बेस्ट स्टोरी (ओरिजिनल)- बिप्लब गोस्वामी (लापता लेडीज)
- बेस्ट स्टोरी (Adapted)- श्रीराम राघवन, अरिजीत बिस्वास, पूजा सुरती, अनुकृती पांडे (मेरी ख्रिसमस)
- सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक - कुणाल खेमू (मडगाव एक्सप्रेस)
- सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेता- लक्ष्य ललवाणी (किल)
- सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेत्री- प्रतिभा रंटा (लापता लेडीज)
- बेस्ट संगीत दिग्दर्शक- राम संपथ (लापता लेडीज)
- बेस्ट गीतकार- प्रशांत पांडे (सजनी- लापता लेडीज)
- सर्वोत्कृष्ट गायक- जुबिन नौटियाल (दुआ- आर्टिकल ३७०)
- सर्वोत्कृष्ट गायिका- श्रेया घोषाल (आमी जे तोमार 3.0 भूल भूलैय्या ३)
- बेस्ट एडिटिंग- जबीन मर्चंट (आर्टिकल ३७०)
- बेस्ट साऊंड डिझाईन- सुभाष साहो, बोलोय कुमार दोलोई, राहुल करपे (किल)
- बेस्ट पटकथा - स्नेहा देसाई (लापता लेडीज)
- बेस्ट संवाद - अर्जुन धवन, आदित्य धर, आदित्य सुहास जांभळे, मोनल ठक्कर (आर्टिकल ३७०)
- बेस्ट सिनेमेटोग्राफी- रफी मेहमूद (किल)
- बेस्ट कोरिओग्राफी- बॉस्को-सीझर (तौबा-तौबा- बॅड न्यूज)
- बेस्ट स्पेशल इफेक्ट्स- Red Chillies VFX (भूल भूलैय्या ३)
- भारतीय सिनेमातील विशेष योगदान पुरस्कार- राकेश रोशन