Join us  

​‘आयफा’तील टीकेने भडकले पहलाज निहलानी; पाठवली कायदेशीर नोटीस!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2017 4:59 AM

निर्माता आणि सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांनी आयफा (इंटरनॅशनल इंडियन फिल्म अ‍ॅकेडमी) व आयफाचे आयोजक विजक्राफ्ट इंटरनॅशनलविरोधात मानहानीचा ...

निर्माता आणि सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांनी आयफा (इंटरनॅशनल इंडियन फिल्म अ‍ॅकेडमी) व आयफाचे आयोजक विजक्राफ्ट इंटरनॅशनलविरोधात मानहानीचा दावा ठोकला आहे. आयफा सोहळ्याच्या मंचावर निहलानी विनोदाचा विषय ठरलेत. नेमकी हीच बाब त्यांच्या जिव्हारी लागली असून यामुळे नाराज होत त्यांनी आयफा व त्यांच्या आयोजकांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे.पहलाज निहलानी यांचे वकील सुरेन उप्पल यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यांनी सांगितले की, न्यूयॉर्कमध्ये गत १५ जुलैला झालेल्या आयफा सोहळ्यात एका अ‍ॅक्टदरम्यान रितेश देशमुख व मनीष पॉल यांनी निहलानी यांच्या फोटोंचा दुरुपयोग केला आणि त्यांना वॉचमॅन संबोधले. यामुळे निहलानी नाराज आहेत. २०१६ व्या आयफा सोहळ्यातही होस्ट फरहान अख्तर व शाहिद कपूर यांनी निहलानींवर अपमानास्पद टीप्पणी केली होती. चित्रपटांत अनावश्यक ‘कट’ सुचवण्यावरून सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहलानी गेल्याकाही दिवसांपासून चर्चेत आहेत. त्यांच्या ‘सेन्सॉरशिप’विरोधात बॉलिवूडच्या अनेकांनी जाहिर टीका केली आहे. पण आयफामधील टीकेने निहलानी चांगलेच भडकेले आहे. बिनशर्त जाहिर माफी मागावी शिवाय यापुढे असला प्रकार न करण्याचे आश्वासन द्यावे, अशी मागणी निहलानी यांनी आपल्या कायदेशीर नोटीसमध्ये केली आहे.निहलानी यासंदर्भात म्हणाले की, आता हे प्रकरण कोर्टात गेले आहे. मी कधी हसायचे आणि लोकांना कधी रडवायचे, हे मला चांगले ठाऊक आहे. आयफाच्या मंचावर माझी टर उडवली जाते. पण ही टर म्हणजे केवळ माझा अपमान नाही तर मी ज्या पदावर आहे, त्या पदाचाही अपमान आहे. हीच गोष्ट मला लोकांच्या गळी उतवायची आहे. २०११ मध्ये अमिताभ बच्चन यांनी आयफाचा बहिष्कार केला होता. तेव्हाच आयफाने आपली प्रतिष्ठा गमावली होती, असेही ते म्हणाले.